Sahil Wakode Case: चैत्यभूमीवर मेणबत्ती मोर्चा काढण्याआधीच आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; साहिलच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला न्याय मिळावा, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन; परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
Sahil Wakode Case
Sahil Wakode CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी चैत्यभूमीवर मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. काही आंदोलकांना ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यांत नेण्यात आले.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याने साहिलला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या कृती समितीने रविवारी सायंकाळी सहा वाजता मोर्चाचे आयोजन केले होते.

Sahil Wakode Case
Tiger Shroff car firing case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ३१ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

या मोर्चात साहिलचे पालक सहभागी होणार होते. मात्र, त्यांच्या वतीने ॲड. सिद्धार्थ इंगळे उपस्थित राहिले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दुपारपासूनच चैत्यभूमी परिसरात बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. काही आंदोलकांनी फलक हातात घेऊन घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

Sahil Wakode Case
NAINA Project: तिसऱ्या मुंबईत रोजगारांची मोठी संधी! १५ लाख नोकऱ्यांचे लक्ष्य, भूमिपुत्रांना प्राधान्य

त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या युवा नेत्या साम्या कोरडे यांच्यासह अन्य आंदोलकही पुढे आले. ॲड. इंगळे यांनी शांततेत आदरांजली वाहण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांनी साम्या कोरडे यांच्यासह अन्य आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी परिसरात घोषणाबाजी झाली.

बुद्धवंदनेनंतर शांततेत मेणबत्‍ती मोर्चा

आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू असताना साहिलच्या पालकांच्या वतीने या मोर्चात सहभागी झालेले त्‍यांचे वकील ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी काही आंदोलकांसह चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुद्धवंदना केली. त्यानंतर कोणतीही घोषणाबाजी न करता मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. त्‍यानंतर साहिल वाकोडे याला आदरांजली वाहण्यात आली.

logo
Pudhari News
pudhari.news