

मुंबई: दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या उत्सवासाठी मुंबईतून मूळ गावी परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून ४१८ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, पुणे, हडपसर, नागपूर, मडगाव यासाठी विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण २७ आणि २८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
कोल्हापूर - कलबुरगि गाड्या
आठवड्यातून ५ दिवस (शुक्रवार वगळून) ( ६४ गाड्या ) १० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही विशेष गाडी दर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, शनिवारी आणि रविवारी कोल्हापूर येथून ०६.१० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
सीएसएमटी - कोल्हापूर - सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडी
१५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी ही विशेष गाडी सीएसएमटी येथून १४.३० वाजता सुटेल व कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल व दर गुरुवारी कोल्हापूर येथून ००.०५ वाजता सुटेल.
सीएसएमटी - लातूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी
द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १३ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी आणि गुरुवारी सीएसएमटी येथून ००.३५ वाजता सुटेल.
सीएसएमटी - नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी १७ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंरबर दरम्यान शनिवारी सीएसएमटी येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३५ वाजता पोहोचेल.
पुणे - नवीन अमरावती साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या
गाडी क्रमांक ०१४०३ ही साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल
हडपसर - गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी
द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दर शुक्रवारी व मंगळवारी हडपसर येथून ०६.५५ वाजता सुटेल
हडपसर - गोरखपूर दैनंदिन विशेष गाड्या
दररोज हडपसर येथून ०७.०५ वाजता सुटेल.
नागपूर - हडपसर द्वी साप्ताहिक विशेष गाडी
द्वी- साप्ताहिक विशेष गाडी ८ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल
नागपूर - हडपसर - नागपूर साप्ताहिक विशेष गाडी
ही विशेष गाडी नागपूर येथून दर शनिवारी १९.४० वाजता सुटेल
कुर्ला एलटीटी- मडगांव साप्ताहिक विशेष गाडी
ही साप्ताहिक विशेष गाडी मडगांव येथून २३ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री १० वाजता सुटेल .