Doctors Strike: आजपासून ओपीडी बंद; उद्यापासून आपत्कालीन सेवाही ठप्प होणार? सीसीएमपी नोंदणीवरून मार्डचे आंदोलन आणखी तीव्र

राज्यातील आरोग्यसेवा ठप्प होणार
Doctors
DoctorsPudhari
Published on
Updated on

मुंबई: सीसीएमपी प्रमाणपत्रधारक बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला स्थगिती द्यावी, क्रॉस-प्रॅक्टिसला कोणत्याही स्वरूपात मान्यता देऊ नये आणि निवासी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावेत, या मागण्यांसाठी सेंट्रल मार्डने सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्यानेही पाठिंबा जाहीर केला आहे.

त्यामुळे ५ ऑगस्टपासून राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील नियमित ओपीडी सेवा बंद राहणार असून, शासनाने मागण्या मान्य न केल्यास ६ ऑगस्टपासून आपत्कालीन सेवाही बंद करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील आरोग्यसेवा ठप्प होणार आहे.

Doctors
Gungi Gudiya Controversy: 'गुंगी गुडिया' वादावर फडणवीसांचा संताप; काँग्रेसवर साधला निशाणा

होमिओपॅथीची एमएमसी नोंदणी सुरू

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला अखेर सुरुवात केली. बुधवारी रात्री डॉ. नेहा पवार यांना पहिले नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.

Doctors
Gungi Gudiya Controversy| ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द किंवा शिवी नाही: सपकाळ

तब्बल १४ वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने होमिओपॅथी डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. दरम्यान, कौन्सिलच्या कार्यालयाबाहेर होमिओपॅथी डॉक्टरांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ते मागे घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आणखी पाच ते सहा डॉक्टरांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती डॉ. बाहुबली शहा यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news