Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात CBIची मोठी कारवाई! FIRमध्ये उद्धव-आदित्य ठाकरेंच नाव, कोणती कलमं लावली?

Disha Salian CBI FIR Case: दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात CBIने हत्या आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांसह FIR दाखल केल्याचे समोर आले आहे.
Disha Salian CBI FIR Case
Disha Salian CBI FIR CasePudhari
Published on
Updated on

Disha Salian CBI FIR Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. CBIने या प्रकरणात औपचारिकरित्या FIR दाखल केला असून, त्यात हत्या आणि सामूहिक बलात्कारासह विविध गंभीर कलमे लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या FIRमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत.

सहा वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण

दिशा सालियान यांच्या मृत्यूला जवळपास सहा वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण लागले आहे. बॉम्बे हायकोर्टाने याच महिन्यात दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. तसेच इतकी वर्षे FIR दाखल न करता केवळ ‘Accidental Death Report’ (ADR)च्या माध्यमातून प्रकरण हाताळल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर CBIने तपासाची औपचारिक सुरुवात करत FIR दाखल केल्याचे समोर आले आहे.

FIRमध्ये काय आरोप?

समोर आलेल्या FIRच्या माहितीनुसार, दिशा सालियान यांच्या मृत्यूमागे कटकारस्थान रचणे, त्यानंतर आत्महत्येची खोटी कहाणी तयार करणे, पुरावे दडपणे किंवा नष्ट करणे तसेच सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.

FIRमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी नमूद करण्यात आली आहे. संबंधित सरकारी कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कागदपत्रे अथवा सरकारी नोंदींमध्ये फेरफार केला का, पुरावे दडपले का किंवा आरोपींना वाचवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर झाला का, याचाही तपास केला जाणार असल्याचे FIRमधून दिसते.

Disha Salian CBI FIR Case
RBI Repo Rate Hike: आधीच महागाईचा मार, आता EMIचा वार; ऑक्टोबरमध्ये RBI देणार मोठा झटका? कर्जदारांची चिंता वाढली

कोणाची चौकशी होणार?

FIRमध्ये आदित्य ठाकरे, रोहन रॉय, डिनो मोरिया, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी आणि इतर व्यक्तींची नावे नमूद असल्याचे वृत्त आहे.

याशिवाय दिशा राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा कर्मचारी, काही सरकारी अधिकारी, फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील संबंधित अधिकारी, पोस्टमॉर्टमशी संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी तसेच यापूर्वीच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी FIRमध्ये करण्यात आली आहे.

8 जून 2020 रोजी झाला होता मृत्यू

दिशा सालियान यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका बहुमजली इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मृत्यू झाला.

या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असल्याचे दावे आणि आरोप त्यानंतर सातत्याने केले गेले. मात्र, या दोन्ही मृत्यूंमधील संबंधांबाबत अनेक दावे सार्वजनिक चर्चेत असले तरी त्यांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

Disha Salian CBI FIR Case
Dagdusheth Ganpati: दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाला जाणार असाल तर हे नक्की वाचा; दर्शन, आरतीपासून लाइव्ह स्ट्रीमपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशीही संबंध जोडला गेला

सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपासही CBIकडे सोपवण्यात आला होता. CBIने आत्महत्येच्या दिशेने तपास करून क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्या अहवालावर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

आता दिशा सालियान प्रकरणात CBIने FIR दाखल केल्याने या प्रकरणातील कटकारस्थान, पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा नव्याने तपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाकडे पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचे: FIRमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव असणे म्हणजे त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध झाले आहेत, असा अर्थ होत नाही. अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news