Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी सीबीआयकडे नोंदवला जबाब

वकिलांनी सीबीआयकडे या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची नावे आणि इतर महत्त्वाची माहिती दिल्याचे समजते.
Disha Salian Case
Disha Salian CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय तपासाला आता वेग आला असून, दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी शुक्रवारी बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात आपला जबाब नोंदविला.

सतीश सालियन यांनी आपल्या तक्रारीत दिशा यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला असून, त्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या वकिलांनी सीबीआयकडे या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची नावे आणि इतर महत्त्वाची माहिती दिल्याचे समजते.

Disha Salian Case
Manoj Jarange Protest: जरांगेंचा मुंबई प्रवेश रोखण्यास हायकोर्टाचा नकार

वकील निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश सालियन यांच्या जबाबात बलात्कार, हत्या आणि कथित कटकारस्थानासंदर्भातील बाबी मांडण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या कथित कबुलीजबाबाची माहितीही सीबीआयला दिल्याचे ओझा यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय तपास

२ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने या प्रकरणात एफआयआर नोंदवून वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच सतीश सालियन यांचा जबाब नोंदवावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Disha Salian Case
High Court Order: पोलिसांची कारवाई हास्यास्पद; मुंबई उच्च न्यायालयाचे तीव्र ताशेरे

न्यायालयाने मात्र तपासात ठोस पुरावे मिळेपर्यंत कोणालाही आरोपी म्हणून संबोधू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तपासात दखलपात्र गुन्हा सिद्ध न झाल्यास सीबीआयने संबंधित न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे. दिशा सालियन यांचा जून २०२० मध्ये मालाडमधील इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news