Byculla Moharram Poison Capsule Case: मोहरम मिरवणुकीत विषारी गोळ्या वाटणाऱ्या फैयाजच्या मोबाईलमध्ये देशविरोधी ई-मेल

तपासात दहशतवादी दुव्‍यांचाही पोलीस छडा लावणार
Byculla Moharram Poison Capsule Case
Byculla Moharram Poison Capsule CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या (झिंक फॉस्फाइडयुक्त कॅप्सूल) वाटप करण्याचा कट उधळून लावल्याच्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.

या प्रकरणात २९ जून रोजी अटक करण्यात आलेला आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजी याच्या मोबाईलमध्ये देशविरोधी आशयाचे काही ई-मेल आढळून आल्याने मुंबई पोलिसांनी संभाव्य दहशतवादी दुव्यांचाही तपास सुरू केला आहे.

Byculla Moharram Poison Capsule Case
Vinayak Raut family case: राऊत पिता-पुत्रासह ४ जणांची अटकपूर्व जामिनासाठी धाव; २३ जुलैला न्यायालयात सुनावणी

तपासादरम्यान फैयाजच्या मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काही संशयास्पद ई-मेल आणि डिजिटल माहिती आढळून आली आहे. या ई-मेलचा उगम, त्यामागील व्यक्ती आणि त्यांचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी किंवा देशविरोधी कारवायांशी संबंध आहे का, याची सखोल पडताळणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणाच्या चौकशीत आरोपीने वैयक्तिक सूडाच्या भावनेतून मोहरमच्या मिरवणुकीचे निमित्त साधत समाजातील मुस्लिम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हा कट रचल्याची कबुली दिली होती. या कबुलीजबाबाची आणि इतर पुराव्यांचीही पडताळणी सुरू आहे.

Byculla Moharram Poison Capsule Case
NCP Internal Dispute: सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदी निवडीला पक्षातून विरोध

यापूर्वी पोलिसांनी आरोपीकडून झिंक फॉस्फाइडयुक्त विषारी कॅप्सूल जप्त केल्या होत्या. या कॅप्सूल मोहरमच्या मिरवणुकीत वाटप करण्याचा त्याचा कथित बेत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आणि न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवून पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, मोबाईलमध्ये आढळलेल्या ई-मेलच्या आधारे दहशतवादी दुव्यांची चौकशी सुरू असली, तरी अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही. डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, परदेशातील संपर्क आणि आरोपीच्या इतर हालचालींची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून, फॉरेन्सिक अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news