Mumbai extortion case : २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा

मसाला डोशामध्ये उंदीर आढळल्याची बतावणी करून केले ब्लॅकमेल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मसाला डोसामध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची रक्कम घेताना दोन महिलांना बोरिवली पोलिसांनी रंगेहाथ पडकले आहे. बोरिवली पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. बोरिवली पश्चिम येथे त्यांचे एक हॉटेल आहे. गेल्या महिन्यात एक महिला दोन पुरुष एका लहान मुलासोबत म्हैसूर मसाला खाण्यासाठी आली होती. डोसा अर्धा खाऊन झाल्यावर तिने त्यात उंदीर आढळल्याचे एकाला सांगितले. त्यानंतर त्या महिलेने दंगा केला होता. तसेच तिने तेव्हा पोलिसांनाही बोलावून घेतले होते. त्याबाबत तिने एक व्हिडिओ क्लिप तयार केला होता.

Crime News
Mumbai Crime : घाटकोपरमध्ये गर्दुल्यांचा धुमाकूळ; मुलाच्या मानेत टोचले इंजेक्शन

हा प्रकार त्याच्या हॉटेलच्या मॅनेजरकडून त्याना समजला. मसाला डोसामध्ये उंदीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलचे लायसन्स सस्पेंड केले होते. तेव्हापासून ते हॉटेल बंद आहे. तसेच हॉटेलच्या मोबाईलवर क्लिप व्हायरलचे फोन येऊ लागले.

सोशल मीडियावर येऊन माफी मागण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार हे घाबरले होते. तेव्हा एक व्यक्ती त्या हॉटेलमध्ये आला. त्याने नुकसान भरपाई म्हणून २५ लाखांची मागणी केली. नुकसान भरपाईची मागणी केल्यावर तक्रारदार याने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.

३० सप्टेंबरला त्यांना एका महिलेचा फोन आला. तिने देखील नुकसान भरपाई म्हणून २५ लाखांची मागणी केली. तेव्हाच त्यांना बोरिवली पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल बाबत फोन येत होते. जर गुन्हा दाखल करायचा नसल्यास भरपाई द्यावी लागेल, अन्यथा व्हिडिओ व्हायरल केला जाईल असे त्याना सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार याने महिलेला भेटायला बोलावले. तेव्हा दोन महिला तेथे आल्या. त्या दिवशी झालेल्या घटनेबाबत चर्चा झाली.

Crime News
Raigad Water Crisis : नोव्हेंबरपासून उरणमध्ये पाणीकपातीचे संकेत

डोसामध्ये उंदीर आढळून आल्याने एकाला त्रास सुरु झाला आहे. त्यांना देखील आम्हालाच बघायचे आहे असे सांगून २५ लाखांची खंडणी मागितली. ती रक्कम जास्त असल्याने तक्रारदार याने चर्चा केली. चर्चा केल्यानंतर सात लाख रुपये रक्कम देण्याचे ठरले. टोकन म्हणून काही पैशांची मागणी केली. तेव्हा एक लाख रुपये त्याने महिलेला रोख स्वरूपात दिले. उरलेल्या पैशांसाठी महिलेने फोन करणे सुरु केले. जर पैसे दिले नाही तर पोलिसांत तक्रार करू असे सांगितले.

सोमवारी महिलेने त्यांना फोन करून पुन्हा पैशाची मागणी केली. खंडणीच्या प्रकाराबाबत तक्रारदार याने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. त्या तक्रार अर्जानुसार पोलिसांनी सोमवारी सापळा रचला. सोमवारी सायंकाळी महिला पैसे घेण्यास आली. तेव्हा पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. खंडणी मागितल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन महिला विरोधात गुन्हा नोंद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news