Mumbai Crime : घाटकोपरमध्ये गर्दुल्यांचा धुमाकूळ; मुलाच्या मानेत टोचले इंजेक्शन

बर्वेनगर शाळेसमोरील उद्यानातील धक्कादायक घटना
Mumbai Crime
मुंबई : मुक्ताबाई रुग्णालयात उपचार घेताना यश चौरसिया.pudhari photo
Published on: 
Updated on: 

घाटकोपर : घाटकोपरच्या बर्वेनगर परिसरात शाळकरी मुलाच्या मानेत इंजेक्शन टोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालिका शाळा क्रमांक ३ समोरील उद्यानात मित्रांसोबत खेळत असलेल्या १२ वर्षीय विद्यार्थ्यावर चार अज्ञात मुलांनी हल्ला करून त्याच्या मानेत इंजेक्शन टोचल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यश चौरसिया हा विद्यार्थी बर्वेनगर येथील पालिका शाळा क्रमांक ३ मध्ये सातवीत शिकतो. सोमवारी (५) सायंकाळी तो मित्रांसोबत शाळेसमोरील उद्यानात खेळत होता. यावेळी चार ते पाच मुले तेथे आली. त्यांनी यश आणि त्याच्या मित्रांना तेथून जाण्यास सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली. यशने ‘मारता का?’ असा जाब विचारला असता त्याचा पाठलाग करून त्याच्या मानेत इंजेक्शन टोचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Mumbai Crime
Mumbai Water Crisis : मुंबईत 2029 पर्यंत दहा टक्के पाणीकपात

घटनेनंतर संशयितांनी तेथून पळ काढला. स्थानिकांनी यशला उद्यानात बसवून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. काही वेळातच त्याला चक्कर येऊ लागली तसेच तापही आला. त्याच्या आईने त्याला तातडीने जवळील मुक्ताबाई रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घाटकोपर पोलिसांनी यशचा जबाब नोंदवून चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बर्वेनगर आणि भटवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नशेखोरांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पालिका शाळा क्रमांक ३ परिसरातही नशेखोरांचे टोळके दिसून येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Mumbai Crime
NMIA Ground Connectivity : नवी मुंबई विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला नवे पंख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news