High Court On Teacher Salary NPS Issue: NPS खाते न उघडल्याने शिक्षकांचे वेतन रोखले; मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Bombay High Court
Bombay High Courtfile photo
Published on
Updated on

High Court On Teacher Salary NPS Issue: मुंबई उच्च न्यायालयाने पालघरमधील तीन प्राथमिक शिक्षकांचे जुलै २०२२ पासून वेतन रोखल्याप्रकरणी राज्याच्या शिक्षण विभागाला चांगलेच फटकारले आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अंतर्गत खाते उघडण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले होते.

Bombay High Court
Mumbai High Court : मैदानेच उरणार नसतील तर लोकांनी मैदानी खेळ खेळायचे कुठे?

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने या कारवाईमुळे शिक्षकांच्या उपजीविकेच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत थकीत वेतन १२ टक्के व्याजासह देण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Bombay High Court
High Court: ९० दिवसांत काल्पनिक वेतनवाढीसह थकबाकी द्या; निवृत्त ZP कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

न्यायालयाने स्पष्ट केले की, संबंधित शिक्षकांसाठी NPS अनिवार्य करण्यात आलेले नव्हते. उलट, २०२१ मधील सरकारच्या पत्राद्वारे NPS स्वीकारले नाही म्हणून कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

तरीही शिक्षक श्रीकांत सुकटे, मधुकर चव्हाण आणि जयवंत गायकवाड यांचे वेतन रोखण्यात आले होते .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news