Bombay High Court on Firecracker: यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करा- मुंबई हायकोर्ट

bombay high court firecrackers: व्यापक जनजागृती करण्याचे राज्य सरकारला निर्देश, ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी सेलिब्रिटींनी पुढाकार घेण्याचे आवाहन
bombay high court firacrackers.
bombay high court firacrackers.Pudhari
Published on: 
Updated on: 

bombay high court firecrackers

मुंबई: दिवाळीत राज्यात कानठळ्या बसवणारे फटाके सार्वजनिक ठिकाणी फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश देताना यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. निला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश देताना प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक मूल्यांची जाणीव ठेवून मराठी कलाकार आणि समाजातील प्रसिद्ध व्यक्तींनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

bombay high court firacrackers.
Tansa Wildlife Sanctuary: तानसाच्या जंगलाला संरक्षणाचे कवच; बिबट्या, भेकरांसह २०० हून अधिक पक्षीप्रजातींचा अधिवास

मराठी कलाकारांना आणि सेलिब्रिटींना एकत्र घेऊन ही जनजागृती मोहीम राबवली जावी मात्र या उपक्रमासाठी कलाकारांवर आणि जाहिरातबाजीवर जनतेचा पैसा खर्च करू नका, अशी सक्त ताकीद राज्य सरकारला दिली.

सण आणि उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनी तसेच हवेच्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठा समोर सोमवारी सुनावणी झाली.

bombay high court firacrackers.
Teacher Recruitment Rules: शिक्षक नियुक्तीसाठी जाहिरात देण्यापूर्वी परवानगी बंधनकारक; उच्च न्यायालयाचा शिक्षण सेवक नियुक्तीबाबत निर्वाळा

यावेळी खंडपिठाने प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक मूल्यांची जाणीव ठेवून मराठी कलाकार आणि समाजातील प्रसिद्ध व्यक्तींनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन खंडपिठाने केले. मराठी कलाकारांना आणि सेलिब्रिटींना एकत्र घेऊन ही जनजागृती मोहीम राबवण्यात यावी, असे सांगतानाच या उपक्रमासाठी कलाकारांवर आणि जाहिरातबाजीवर जनतेचा पैसा खर्च करू नका, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.

मुंबई आणि पुण्यातील कलाकार मंडळींना ज्या शहराने इतके काही दिले आहे, त्याची परतफेड करण्याची हीच खरी संधी आहे; त्यामुळे सेलिब्रिटींनी या मोहिमेसाठी विनामूल्य काम करण्यास तयार व्हायला हवे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

अहवाल महिनाभराच्या आत

दरम्यान राज्य सरकारने टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेची माहिती न्यायालयात सादर केली. यावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने प्रशासनाला सेलिब्रिटींचा सहभाग वाढवण्यावर भर देण्याची सूचना करताना याचिकेची सुनावणी २५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

यंदाच्या दिवाळीच्या काळात प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजागृतीसाठी केलेल्या सर्व कामांचा विस्तृत अहवाल महिनाभराच्या आत न्यायालयात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news