

प्रकाश साबळे
मुंबई : महानगरपालिकेत गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सहाय्यक अभियंता संवर्गातील अभियंत्यांचे रखडलेली पदोन्नतीला अखेर मुहूर्त मिळेला असून तब्बल १६१ सहाय्यक अभियंत्यांचे कार्यकारी अभियंता पदावर प्रमोशन होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रमोशन झालेल्या कार्यकारी अभियंत्यांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित होणार असल्याची माहिती नगर अभियंता विभागातील प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेतील यात्रिकी आणि सिव्हिल या दोन विभागात अभियंत्ये कार्यरत आहेत. सिव्हिल (स्थापत्य) विभागातील १६१ सहाय्यक अभियंत्यांचे प्रशासकीय राजवटीत प्रमोशन रखडले होते. मात्र आता महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवक बहूमतांने सभागृहात वियाजमान झाल्याने या सहाय्यक अभियंत्यांचा प्रमोशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवार, १७ एप्रिल रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रमोशन कमिटीची बैठक पार पडली. या बैठकित सुमारे १६१ सहाय्यक अभियंत्यांची पदोन्नती करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसा प्रस्ताव नगर अभियंता विभागाकडून लवकरच महानगरपालिकेच्या सभागृहात सादर करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून विभाग कार्यकारी अधिकारी, पदनिर्देशक अधिकारी (डीओ) तसेच नगर विकास विभाग, बिल्डिंग व इमारत विभाग,कोस्टल रोड, पूल, रस्ते विभाग,घनकचरा व्यवस्थापन विभाग, मल:निसारण जलवाहिनी, सीटीआरसी, मालमत्ता असे सुमारे ३० विविध खात्यांमध्ये कार्यकारी अभियंता संवर्गातील पदे रिक्त होती. यामुळे याचा थेटट परिणाम हा विकास कामांवर होत होता. विभाग कार्यालयांसह इतर विभागाचा कार्यभार चालविण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांना प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता.
या विभागात येणार कार्यकारी अभियंते :
महानगरपालिकेतील १६ विभाग कार्यालये, २३ विभागातील पदनिर्देशक अधिकारी आणि नगर विकास, इमारत व प्रप्रोजर विभाग, दक्षता विभाग, रस्ते वाहतूक, प्रोजेक्ट, जल अभियंता, मल: निसारण, सिव्हरेज आॅपरेशन, इमारत व परिरक्षण, शाळा व पायाभूत सुविधा, मध्यवर्ती खरेदी खाते.
या वाॅर्डात नियुक्त होणार कार्यकारी अभियंते :
बी, सी, डी, जी.नाॅर्थ, जी.साऊंथ, एच.पुर्व, एच.वेस्ट, एल, एम.पुर्व, एम.वेस्ट, पी.पुर्व, पी.दक्षिण, आर.दक्षिण, आर.नाॅर्थ, एस आणि टी वाॅर्ड