New BMC general body hall - अडीच वर्षांत उभे राहणार महापालिकेचे नवे सभागृह !

to be built in 2.5 years- अडीच वर्षांत उभे राहणार महापालिकेचे नवे सभागृह !
BMC news
BMC newsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेचे भव्य सभागृह उभारण्याचा प्रस्ताव आठवड्यात १२ नोव्हेंबरला स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये सभागृहाची इमारत उभी राहील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह सध्याचे ऐतिहासिक सभागृह १८९३ मध्ये उभारण्यात आले आहे. सुरुवातीला नगरसेवकांची संख्या कमी असल्यामुळे हे सभागृह पुरेसे होते. १९९१ नंतर नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे या सभागृहात जागा अपुरी पडू लागली. परंतु आता नगरसेवकांची संख्या २३७ इतकी झाली असून सभागृहात पत्रकार, सचिव विभागाचे अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित असल्यामुळे जागा अपुरी पडत आहे. या सभागृहासह कर्मचाऱ्यांची क्रीडा भवन स्थायी समितीमध्ये आज सादर होणार प्रस्ताव उभे राहणार आहे.

या सभागृहाचा शुभारंभ नोव्हेंबर अखेरीस होणार असून अडीच वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे. एप्रिल २०२९ पर्यंत हे सभागृह उभे राहील, असे सांगण्यात येत आहे. नव्या वास्तूमध्ये दालन सांस्कृतिक कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, इनडोअर गेम, व अन्य क्रीडा भवनमध्ये लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

BMC news
Navi Mumbai cleanest city India - 'स्वच्छ' शहरांत नवी मुंबई देशात प्रथम

त्याशिवाय नगरसेवकांसह पत्रकार अधिकारी यांना नीट बसता यावे यासाठी आसन व्यवस्था साडेतीनशे पेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

BMC news
संतापजनक! मुंबई लोकलमध्ये छेडछाडीला विरोध करताच तरुणीला ढकलले रुळांवर; ट्रेनखाली गमावला एक हात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.