

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक २०२५ - २६ च्या निवडणूकीत सुमारे ३७७अक्षप उमेदवार मैदानात उतरले आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे सह लहान-मोठ्या राजकिय पक्षांतील उमेदरारांना टक्कर देण्यासाठी हे ३७७ उमेदवार महापालिका निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत. परिणामी प्रत्येक वॉर्डात अपक्षामुळे निवडणूकीची चूरस वाढली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तब्बल तीन वर्षांनंतर होत आहे. यामुळे राजकिय पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहे. त्यांना शह देण्यासाठी आता अपक्ष उमेदवारही मागे नसल्याचे चित्र वॉर्डात दिसून येत आहे. एका वॉर्डात किमान ५ ते ७ अपक्ष उमेदवार उभे आहेत. काही वॉर्डात ही संख्या १० ते १५ पर्यंत असल्याचे दिसून येते.
सर्वाधिक उमेदवार अपक्ष उमेदवार हे पश्चिम आणि पुर्व उपसगरांतील आहेत. टी विभागातील वॉर्ड क्रमांक १२३ ते १३३ आणि एल विभागातील वॉर्ड क्रमांक १८२ ते १९२ या दोन्ही प्रभागातील वॉर्डात ३७ अपक्ष उमेदवार आहेत. दहिसर विधानसभा मतदार संघातील आर. उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक १ ते १८ मध्ये फक्त ९ अपक्ष उमेदवार आहेत.
ही चिन्हे मिळाली
सफरचंद, नगारा, शिलाई मशिन, बॅट, बॉल, एअर कंडिशनर, गॅस, शिट्टी, नारळ, कपबशी, सीसीटीव्ही कॅमेरा अशी विविध चिन्ह अपक्ष उमेदवारांना देण्यात आली.
'सफरचंद'ला मागणी
पनवेल महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले होते. शनिवारी उमेदवारांना सफरचंद, गॅस शेगडी, हेलिकॉप्टर, झाडू, कपबशी यांसह विविध निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये 'सफरचंद' या चिन्हाला अपक्ष उमेदवारांकडून सर्वाधिक मागणी होती. 'खटारा' आणि 'कपबशी' या चिन्हांनाही उमेदवारांनी चांगलीच पसंती दिली. पनवेलमध्ये एकूण २५५ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष बाब म्हणजे अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असून, त्यांच्यात चिन्हासाठी मोठी चुरस होती.