BMC internal conflict : ओएसडीला हटविण्यासाठी सहायक आयुक्त मैदानात

20 सहायक आयुक्तांचे थेट आयुक्तांना पत्र
BMC internal conflict
ओएसडीला हटविण्यासाठी सहायक आयुक्त मैदानात(File Photo)
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कार्यालयाचे सह आयुक्त तथा ओएसडी चंद्रशेखर चोरे यांना हटविण्यासाठी पालिका उपायुक्तांनंतर आता सहाय्यक आयुक्तसुध्दा मैदानात उतरले आहेत. बुधवारी 20 सहाय्यक आयुक्तांनी स्वाक्षरी केलेले पत्र पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना देवून विशेष कार्यकारी अधिकारी चोरे यांना पदमुक्त तथा मुदतवाढ न देण्याची एकमुखी मागणी केली आहे.

महापालिका आयुक्त कार्यालयातून 1 जानेवारी 2025 रोजी चंद्रशेखर चोरे सेवानिवृत्त झाले होते. मात्र त्यांची पुन्हा मुंबई महापालिकेत आयुक्त कार्यालयातच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे पालिकेतील उपायुक्तांनी नाराजी दर्शविली होती. मात्र तरीसुध्दा आयुक्ताची त्यांची एका वर्षासाठी नियुक्ती केली होती. आता त्यांचा 31 डिसेंबर 2025 मध्ये एक वर्षाचा कालावधी संपणार आहे. यामुळे एक महिनाआधीच उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्याविरोधात उघडपणे बंड सुरु केले आहे.

BMC internal conflict
BDD residents housing issue : नायगाव बीडीडीवासीयांचे गृहस्वप्न लांबणीवर

गेल्या आठवड्यात पालिकेतील 15 उपायुक्तांनी पत्र पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना पाठवले होते. त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेतील 20 सहायक आयुक्तानीही उपायुक्तांच्या लढ्याला पाठिंबा दिला.

आयुक्त कार्यालय हे पद तत्काळ सहआयुक्त/उपायुक्त संवर्गातून भरण्याची मागणी सहायक आयुक्तांनी पत्रात केली आहे. तसेच नियमित अधिकाऱ्याचे पद रिक्त ठेऊन तेथे समांतर अधिकाऱ्याची नेमणूक करणे ही बाब अन्यायकारक असून संवर्गातील अधिकाऱ्यांची पदोन्नती, सेवेचा कालावधी, अनुभव, निवडश्रेणी, वेतनश्रेणी यासाठी बाधा ठरणारी आहे. त्यामुळे उपायुक्त (आयुक्त कार्यालय) हे पद तत्काळ सहआयुक्त/उपायुक्त संवर्गातून भरावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

BMC internal conflict
Local body elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आम्ही निवृत्त अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायचे?

उपायुक्तांनी आयुक्तांना पत्र पाठवण्याआधी चौरे यांना हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सर्व अधिकाऱ्यांनी मिळून पालिका आयुक्तांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला आयुक्तांनी दाद दिली नाही, असे काही उपायुक्तांचे म्हणणे आहे. मग आम्ही निवृत्त अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायचे? असा सवाल उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news