Local body elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश
Local body elections
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीरFile Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खा. नारायण राणे आदी 40 नेते प्रचार करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Local body elections
Local body election symbols : पिपाणी चिन्ह आयोगाने हटवले

मुंबईसाठी चार सरचिटणीसांची नियुक्ती

आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने काही महिन्यांपूर्वी आमदार अमित साटम यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड केली. तेव्हापासून मुंबई कार्यकारिणीच्या नियुक्तीची चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांची घोषणा होऊ शकली नाही. मात्र, आता मुंबईसाठी चार सरचिटणीसांची घोषणा करण्यात आली आहे. यात राजेश शिरवाडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळकर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Local body elections
Mumbai Metro Line 6 : कारशेडशिवाय सुरू होणार स्वामी समर्थनगर-विक्रोळी मेट्रो 6

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news