BKC Metro 2B: मेट्रोच्या कामामुळे बीकेसीतील फूटपाथ गायब; डायमंड मार्केट येथील फूटपाथवर बांधकामाचे साहित्य

पादचाऱ्यांना चालण्यासाठी फूटपाथवर जागा शिल्लक न राहिल्याने रस्त्यावरून चालावे लागते.परिणामी, अपघाताचा धोका संभवतो.
BKC Metro 2B
BKC Metro 2BPudhari
Published on
Updated on

मुंबई: वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील डायमंड मार्केट येथे मेट्रो २ ब मार्गिकेच्या स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथची दुरवस्था झाली आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी फूटपाथवर जागा शिल्लक न राहिल्याने रस्त्यावरून चालावे लागते.परिणामी, अपघाताचा धोका संभवतो.

दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ या सध्या कार्यान्वित असलेल्या मार्गिकेचा विस्तार म्हणून मेट्रो २ ब मार्गिका उभारली जात आहे.

BKC Metro 2B
Mumbai Flower Market: श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर फूल बाजार फुलला

अंधेरी पश्चिम म्हणजेच डीएननगर ते मंडाळे अशी २३.६४३ किमीची ही मार्गिका आहे. यापैकी मंडाळे ते डायमंड गार्डन हा टप्पा काही महिन्यांपूर्वी सुरू झाला. काही दिवसांपूर्वी चेंबूर मेट्रो स्थानकही सुरू झाले. सध्या चेंबूर ते अंधेरी या टप्प्याचे बांधकाम सुरू आहे.

बीकेसीतील डायमंड मार्केट इमारतीजवळ मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. येथील मेट्रो स्थानकाच्या खांबांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे; मात्र त्यानंतरही गेले कित्येक महिने फूटपाथ मोकळे करण्यात आलेले नाहीत.

BKC Metro 2B
Mumbai Police News: मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तपद अवघ्या दोन वर्षांत इतिहासजमा!

फूटपाथवरील पेव्हर ब्लॉक्स काढण्यात आले आहेत. काही ठिकाणी सळ्या आणि बॅरिकेड्स टाकून ठेवण्यात आले आहेत. स्थानकाच्या बांधकामातील साहित्य फूटपाथवर पडून राहिल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही.

मेट्रो स्थानकाचे काम सुरू असताना फूटपाथवर खोदकाम केल्यास पादचाऱ्यांना चालण्यासाठी काही जागा मोकळी सोडणे अपेक्षित आहे. मात्र डायमंड मार्केट येथे असे करण्यात आलेले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते.

भरधाव वाहनांच्या शेजारून वाट काढत चालताना पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. एमएमआरडीएशी संपर्क साधला असता यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news