Mumbai Flower Market: श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर फूल बाजार फुलला

दादर, भुलेश्वरसह उपनगरांत ग्राहकांची लगबग; नवीन फुलांची आवक पण; दर स्थिर
Mumbai Flower Market
Mumbai Flower MarketPudhari
Published on
Updated on

मुंबई: श्रावणातील पहिला सोमवार आणि त्यातच नागपंचमी हा सण आहे.देव पूजेसाठी नैसर्गिक फुले,पुष्पहार,दुर्वा,बेल पत्र आदी साहित्य खरेदी करिता मुंबईतील दादर,भुलेश्वर फुलबाजारसह उपनगरमधील फूल बाजारात रविवारी दिवसभर ग्राहकांची लगबग होती.

गेल्या दोन महिन्यापूुर्वी शेतकऱ्यांनी फूलांची लागवड केल्याने नवीन फुलांची आवक श्रावणाच्या सुरुवातीला सुरू झाली आहे. बाजारपेठेत सर्वप्रकारच्या फुलांची आवक वाढली असली तरी फुलांचे दर कमी झालेले नाहीत.दर स्थिर आहेत.

Mumbai Flower Market
Mumbai Police News: मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तपद अवघ्या दोन वर्षांत इतिहासजमा!

श्रावण व सणामुळे ग्राहक इतर वेळेपेक्षा सरासरी २५ ते ३० टक्के वाढला असल्याचे दादर मधील फुल विक्रेत्यांनी सांगितले.एकंदरीत श्रावण व सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गर्दी होती.

श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हा सण आहे. यासाठी दादर, भायखळा, भुलेश्वर या शहरात तर उपनगरातील मालाड, बोरिवली, घाटकोपर,भांडुप, मुलुंड आदी बाजार पेठेत रविवारी दिवसभर ग्राहकांची फुल, पुष्पहार, चाफ्याची वेणी, दुर्वा, बेलपत्र खरेदी साठी ग्राहकांची लगबग सुरु होती. त्याचबरोबर एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांनी फूलांची लागवड केली होती.त्यामुळे बाजार पेठेत नवीन फुलांची आवक आली आहे.

Mumbai Flower Market
CGP Protest Fake News: सीजीपी आंदोलनातील ‘फेक न्यूज’चा तपास सुरूच; ४२९ आक्षेपार्ह पोस्ट-हँडल्सची छाननी

फुलांची आवक मोठ्या प्रमाणात आले असले तरी फुलांचे दर स्थिर आहेत. फुल बाजारात झेंडू (पिवळा व केशरी ) प्रतिकिलो ३० ते पासून ते ६० रुपये पर्यंत, शेवंती ओली ६० रूपये, शेवंती सुकी ८० ते १०० रुपये, निशिगंधा (गुलछडी)१५० ते १६० रुपये, मोगरा ५०० ते ६०० रुपये,

मोगरा कोईमतूर ३०० ते ४०० रुपये, कण्हेर २०० रुपयापासून ते २८० रुपये पर्यंत, गुलाब फूल १०० ते १२० रुपये प्रति किलो तर

चाफा १०० रुपयांना १०० नग आणि दुर्वा पेंढी २० रुपये (५० रुपयांना तीन पेंड्या) बेलपत्र दहा रुपये,लहान पुष्पहार ४० रुपयाला एक तर मोठा पुष्पहार १०० रुपयांना, चाफ्याची वेणी १० रुपये असे दर होते.

केळीचे पान १० रुपयाला..

श्रावण महिन्यात एका सोमवारी केळीच्या पानावर उपवास सोडण्याची प्रथा व परंपरा आहे.त्यानुसार अनेक जन पानावर उपवास सोडतात.आज महागाई काळात केळीचे पान १० रुपयांना झाले आहे.ते घेण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होती.

पाऊस ओसरल्याने व तीन महिन्यापूर्वी फुलांची लागवड झाली होती.त्यामुळे सर्वप्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. घाऊक विक्रेते हे थेट शेतकऱ्यांशी जोडून फुले खरेदी करतात.श्रावण व सणाच्या काळात सरासरी २५ ते ३० टक्के जादा ग्राहक इतर वेळेपेक्षा वाढतात.

- दीपक रोकडे, फुल विक्रेता, माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार दादर (पश्चिम )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news