

मुंबई ः अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी काही काळापुरती म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत भारतीय जनता पक्षाकडे राहणार असून मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करण्याची भूमिका बजावतील.मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हे खाते राष्ट्रवादीकडे सोपवले जाणार असल्याचे सांगितले जाते आहे.
मात्र राज्याचे अंदाजपत्रक केवळ काही दिवसात सहा मार्च रोजी मांडायचे असल्याने सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ती जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निभावणार आहेत.राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाच्या नेत्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, मात्र विलिनीकरणाच्या हालचाली खरोखरच प्रत्यक्षात आल्या तर हे खाते एनडीए मध्ये सामील झालेल्या एका महत्त्वाच्या नेत्याकडे सोपवले जाईल असेही राजकीय वर्तुळात सांगितले जाते आहे.
हा नेता म्हणजे जयंत पाटील का याविषयीही तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र आत्ता या संदर्भात कोणतीही चर्चा करणे अनुचित असून राज्याला विकासाच्या पथावर नेण्यासाठी प्राप्त परिस्थितीत फडणवीस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत एवढेच सध्या बोलता येईल असे एका ज्येष्ठ नेत्याने पुढारीशी बोलताना नमूद केले.