BJP Registration BMC: भाजपची स्वतंत्र गटनोंदणी; गणेश खणकर गटनेतेपदी, युतीचा प्रयत्न फसला

शिंदे गटाची अनास्था भोवली; महापौर निवडणुकीआधी मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे तापली
BJP Registration BMC
BJP Registration BMCPudhari
Published on
Updated on

मुंबई : अखेर भाजपाने आपल्या गटाची स्वतंत्र नोंदणी केली असून गटनेतेपदी दहिसरचे नगरसेवक गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध समित्यांमधील सदस्य संख्या वाढवण्यासाठी भाजपा-शिवसेनेचा एकत्र गट स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फारसे उत्सुक नसल्यामुळे फसला. अखेर सोमवारी भाजपने पक्ष प्रवक्ता, दहिसरचे नगरसेवक गणेश खणकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करत स्वतंत्र गटाची नोंदणी केली. ओघानेच खणकर हेच सभागृह नेतेपदी विराजमान होणार आहेत.

BJP Registration BMC
NCP Merger: राष्ट्रवादी विलीनीकरणाचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच; ‘नेमकं कोण कोणात विलीन होणार होतं?

भाजपाच्या गटनेतेपदी प्रभाकर शिंदे, गणेश खणकर यांच्या नावाची सुरुवातीपासून चर्चा होती. मात्र शिंदे यांच्याकडे मुंबई महापालिकेतील अन्य जबाबदारी सोपवण्यात येणार असल्यामुळे त्यांना गटनेते पद देण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

BJP Registration BMC
NCP Merger Controversy: राष्ट्रवादी विलीनीकरणावर राजकीय रणसंग्राम; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

सभागृह नेत्यांना वैधानिक दर्जा

मुंबई महापालिकेत सभागृह नेते पदाला विशेष महत्त्व आहे. या पदाला वैधानिक दर्जा असून सभागृह नेत्यांना मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वतंत्र दालन, कार्यालय, कर्मचारी, वाहन अन्य सुविधा दिल्या जातात. सभागृह नेत्याला केवळ पक्षाची बाजू भक्कमपणे मांडावी लागत नाही तर सभागृहातील कामकाजात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सभागृहातील कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात चालावे यासाठी त्यांना सर्व पक्षाशी मिळवून घ्यावे लागते.

BJP Registration BMC
Election Ink Controversy: मतदानातील शाई पुसली जातेय? राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयोगशाळा तपासणीचे आदेश

मुंबई महापौरपदाची निवडणूक 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता असून, आता भाजप आणि शिवसेनेत सत्तावाटपाच्या हालचाली गतीने होण्याची चिन्हे आहेत. महापौरपद किंवा स्थायी समितीचे सभापतीपद मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न राहील, असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news