Election Ink Controversy: मतदानातील शाई पुसली जातेय? राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयोगशाळा तपासणीचे आदेश

महानगरपालिका निवडणुकांतील ‘इंडेलिबल इंक’ वादावर फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष
Election Ink Controversy
Election Ink ControversyPudhari
Published on
Updated on

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाने शाई तपासणीसाठी एका प्रयोगशाळेत पाठवली आहे.

Election Ink Controversy
Mumbai Mayor Election: आंगणेवाडी यात्रेनंतर मुंबई महापालिकेचा नवा महापौर; 11 फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता

आयोगाचे याबाबतच्या फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष लागले आहे. तर या शाईच्या वापराबाबत काय गौड बंगाल असेल, याकडे विरोधी पक्ष लक्ष लावून आहे.

Election Ink Controversy
Sunetra Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे द्या; राष्ट्रवादीच्या तीस आमदारांचे पत्र

चार ते पाच वर्षे निवडणुका न झाल्यामुळे राज्यातील सर्वच महानगरपालिकांवर प्रशासक राज होते. अखेरीस, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने एकाचवेळी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व ठिकाणी 5 जानेवारी रोजी मतदान झाले. पण अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई ताबडतोब पुसली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्षेप घेत राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.

Election Ink Controversy
Malad Gas Cylinder Blast |मालवणीतील गॅस सिलिंडर स्फोट: दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू, २ जणांची प्रकृती गंभीर

यावर स्पष्टीकरण देताना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बोटावरील मार्कर पेनची शाई पुसली जात आहे, असा संभ्रम पसरवला जात आहे. ही शाई इंडेबल इंक आहे. मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे. मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग 2011 पासून हे वापरत आहे. ही शाई पुसली जात नाही, असे स्पष्ट केले होते.

Election Ink Controversy
India Budget 2026 analysis: विश्वगुरु बनण्याचा मार्ग सुकर करणारा अर्थसंकल्प

भारतात निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी पारंपरिक “इंडेलिबल इंक” वापरली जाते. हे उत्पादन मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड या सरकारी कंपनीकडून निवडणुका इत्यादींसाठी बनवले जाते, पण स्थानीय महापालिका निवडणुकीत मार्कर पेन पुरवठादार कोरेस इंडिया लिमिटेड या कंपनीकडून शाई पुरवण्यात आली होती. याबाबत विरोधी पक्षांनी जोरदार हरकत घेतल्यानंतर आणि तक्रारी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात शाई तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. मात्र, याबाबतचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news