Bipasha Basu: बिपाशाच्या प्रोटीन पावडरमध्ये चक्क अळ्या! VIDEO पाहून उडेल थरकाप; तुकाराम मुंढेंना थेट टॅग करत म्हणाली...

Bipasha Basu Protein Powder Worms: बिपाशा बासूने प्रोटीन पावडरमध्ये अळ्या आढळल्याचा दावा करत धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Bipasha Basu Tukaram Mundhe
Bipasha Basu Tukaram MundhePudhari
Published on
Updated on

Bipasha Basu Protein Powder Worms: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने एका न्यूट्रिशन प्रोडक्टबाबत गंभीर दावा केला असून, प्रोटीन पावडरच्या कंटेनरमध्ये लहान अळ्या आढळल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकरणी तिने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना थेट टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.

बिपाशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित प्रोडक्टचा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये ती एका ग्लासमध्ये प्रोटीन पावडर ओतताना दिसते. त्यानंतर पावडरमध्ये आढळलेल्या छोट्या कीटकांकडे ती लक्ष वेधते. यातील एका कीटकाचा तिने जवळून व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे. कंटेनर नुकताच उघडला असतानाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या आढळल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.

Bipasha Basu Tukaram Mundhe
Gold Price Today: गणेश चतुर्थीआधी सोने पुन्हा महागले; चांदीतही तेजी, जाणून घ्या आजचे भाव
Bipasha Basu Protein Powder Worms
Bipasha Basu Protein Powder WormsPudhari

या प्रकारानंतर बिपाशाने तुकाराम मुंढे यांना टॅग करत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली. ग्राहकांना भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने मिळू नयेत, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे तिने म्हटले आहे. “आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात,” अशी विनंती तिने केली आहे.

Bipasha Basu Tukaram Mundhe
iPhone Duo Price: 20 ग्रॅम सोनं, नवीन कार... iPhone Duoच्या किमतीत तुम्ही काय खरेदी करू शकता? पाहा यादी

दरम्यान, बिपाशाने केलेल्या दाव्याचा स्वतंत्रपणे तपास झाला नाही. तसेच संबंधित न्यूट्रिशन ब्रँड किंवा FDAकडून या तक्रारीवर अधिकृत प्रतिक्रिया अथवा कारवाईची माहिती समोर आलेली नाही.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेबाबत सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर बिपाशाची ही पोस्ट चर्चेत आली आहे. यापूर्वीही सेलिब्रिटींकडून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात FDAकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news