Bhushan Gagrani: भूषण गगराणी अडचणीत : समिती बैठकीस गैरहजेरीवरून हक्कभंगाची सूचना

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा रोष; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय राखीव
Bhushan Gagrani
Bhushan GagraniPudhari
Published on
Updated on

मुंबई : अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना देण्यात आली आहे. तर, यासंदर्भात पालिका आयुक्तांचा खुलासा आला असून पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठविण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगून विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग सूचनेवरील आपला निर्णय राखून ठेवला.

Bhushan Gagrani
Mahayuti Conflict Maharashtra: महायुतीत तणाव वाढला : सातारा प्रकरणावरून शिंदेंचा बैठकीवर बहिष्कार

विधानसभेत मंगळवारी भाजप आमदार राजू तोडसाम यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सादर केला. मात्र, विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची ही समिती 4 नोव्हेंबर 2025 रोजी नियोजित बैठकीसाठी मुंबई महापालिकेच्या दौऱ्यावर होती.

Bhushan Gagrani
CM Devendra Fadnavis | राज्याच्या विकासासाठी भांडवली गुंतवणूक वाढविणार

बैठकीची पूर्वसूचना दिलेली असतानाही पालिका आयुक्त गगराणी हे आपल्या दालनात असूनही समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिले. तसेच, राजशिष्टाचारानुसार त्यांनी समितीचे स्वागतही केले नाही. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी कार्यरत समितीसोबत त्यांचे हे वर्तन अत्यंत खेदजनक असून त्यांच्या कृतीने आदिवासी समाजासह विधिमंडळाचा अवमान झाला आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याविरुद्ध हक्कभंगाची सूचना दिली होती. त्यामुळे हा विषय विशेष हक्क समितीकडे पाठविण्याची मागणी तोडसाम यांनी अहवाल सादर करताना केली.

Bhushan Gagrani
Devendra Fadnavis : जे साथ देतील त्यांच्यासोबत; अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ, पण...

त्यावर, या हक्कभंगाच्या प्रस्तावासंदर्भात विभागाने गगराणी यांच्याकडे मागविलेला खुलासा आलेला आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठविण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी यावरील आपला निर्णय राखून ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news