भातसा धरण भरले; ठाणे- मुंबईकरांना दिलासा

भातसा धरण भरले; ठाणे- मुंबईकरांना दिलासा
Published on
Updated on

शहापूर तालुक्यातील भातसा धरण शनिवारी ९९ टक्के भरले असून, धरणाचे पाच दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. या धरणातून ठाणे – मुंबई सारख्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाई जाणवणार नाही.

ठाणे – मुंबई करांना पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यांतील भातसा धरण हे शनिवार दि .११ सप्टेंबर रोजी ९९ टक्के भरले असल्याने धरणाचे पाच दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आले असल्याची माहिती येथील कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी दिली. धरणाची पाणी पातळी १४१.७० मीटर तर पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर एवढी आहे. यापैकि ९३३.२९३ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच एकुण पाणी साठा ९६७.२९३ दलघमी ऐवढा आहे.

धरण पूर्ण संचय साठा ९७६.१० असा असुन सद्यस्थितीत ९९.६० टक्के येवढे धरण भरले आहे. भातसा क्षेत्रात ४१.०० मीमी येवढा काल पाऊस झाला आहे. एकुण पाऊस २३१८ .०० मिमी असुन मागील वर्षी २५२०.०० मिमी येवढा पाऊस भातसा धरण क्षेत्रात झाला.

सांडवा वरून सोडण्यात आलेला विसर्ग १९०.८९क्यूमेकस असा आहे. विद्युत गृहातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग २१.१३६ म्यूमेकस (१८२८ एम्एलडी) असा आहे. भातसा धरणातून ठाणे – मुंबई शहरांना दररोज प्रती दिनी प्रती ताशी साडेचार हजार दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते.

परंतु या पाण्यांची मध्यंतरीच्या मार्गात चोरी तसेच पाणी योग्य पध्दतीने नियोजन करून वापरले जात नसल्याने काही वेळा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र यावर्षी धरण चांगल्या पध्दतीने भरल्यामुळे टंचाई जाणवणार नसल्याचे लक्षात येते.

[visual_portfolio id="37019"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news