

Bharuch Memu Train Derails: विरारवरून निघालेल्या भरूच मेमू ट्रेनचा डबा घसरला असून त्यामुळं गुजरातकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात भिलाड रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली असून विरारहून भरूचकडे जाणाऱ्या भरूच मेमू इंजिन रूळावरून घसरलं आहे.
ट्रेनमधील सर्व प्रवासी हे सुरक्षित असून कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. या ट्रेनमधून दररोज प्रवास करणारे कामगार, नोकरदार, तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात.
या घटनेमुळे मुंबई–अहमदाबाद मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, या मार्गावरील अनेक गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे.