Job Fraud Mumbai : नोकरीच्या अमिषाने महिलेची फसवणुक

फसवणुकीप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Job Fraud
Job FraudPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : सोशल मिडीयावर नोकरीची जाहिरात देऊन एका महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ९० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने पाचजणांच्या टोळीविरुद्ध फसवणुकीसह खंडणीसाठी धम्की देणे, आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

३१ वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या आई-वडिलांसोबत भांडुप परिसरात राहत असून ती सध्या एका खाजगी कंपनीत नोकरी करते.याच दरम्यान तिला सोशल मिडीयावर नोकरीची एक जाहिरात दिसली होती. त्यात एका नामांकित कंपनीत डेटा एंटी करणार्‍या महिलेची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिने तिथे नोकरीसाठी अर्ज केला होता. काही दिवसांनी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता.

Job Fraud
Poladpur Rural Roads : पोलादपूर कामथे ते पुणे-हिर्डोशी नवा मार्ग हवा

नोकरीसाठी प्रोसेसिंग फी, नोंदणी फी, जीएसटी आदीसाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. नोकरीची गरज असल्याने तिने ती रक्कम संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम भरल्यानंतर तिचा फॉर्मसह शैक्षणिक कागदपत्रे घेण्यात आले होते. काही दिवसांनी तिला दुसर्‍या एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. त्याने तिला कंपनीची एक पॉलिसी आहे. ती पॉलिसी घेऊन पैसे भरावे लागतील असे सांगितले.

ही पॉलिसी न घेतल्यास तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने पॉलिसीची रक्कम भरली होती. गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या पाच व्यक्तींनी नोकरीसह प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी तसेच पॉलिसीसाठी तिच्याकडून ९० लाख ८७ हजार रुपये घेतले होते.

Job Fraud
Raigad Illegal Hill Mining : नव्या गौण खनिज उत्‍खनामुळे सह्याद्रीचे अस्‍तित्‍व धोक्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.