Poladpur Rural Roads : पोलादपूर कामथे ते पुणे-हिर्डोशी नवा मार्ग हवा

वरंध घाटाला मिळेल पर्याय, पोलादपूर वासीयांना जवळचा मार्ग
Poladpur Rural Roads
Poladpur Rural Roadspudhari photo
Published on: 
Updated on: 

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्ग, समुध्दी महामार्ग, दिधी पुणे मार्गप्रमाणे ग्रामीण भागातील रस्तेची दुरुस्तीसह मजबुती करणं व पर्याय रस्ते निर्माण केल्यास ग्रामीण भागाचा दळणवळणाच्या मांद्यमातून विकास साधता येणार आहे ग्रामीण भागातील गावांना व जिल्ह्यातील सीमा नव्याने आखणी करत जोडल्यास गावाचा कायापालट होणार आहे. मात्र राज्य शासन ग्रामीण भागाकडे विशेष कोकणात दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

कामथे ते पुणेजिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिर्डोशी या मार्गावरील 10 किमीचा रस्ता डोंगरातून, घाटमार्गातून करावा लागणार आहे त्या साठी रस्ते विभागाने जिल्हा नव्याने रस्त्याची आखणी करत मार्गाची निर्मिती करणे गरजेचे आहे. तालुक्यातील नागरिकांना मोठ्या शहरात किंवा घाट मार्गवर जाण्यासाठी म्हाप्रल पंढरपूर मार्ग ,सह महाबळेश्वर मार्गे, माणगांव निजामपूर ताम्हणी मार्गे पुण्याला जाता येत मात्र या गावातील नागरिकांना सर्वात जवळचा मार्ग म्हणजे म्हाप्रल वरंध पंढरपूर मार्ग आहे.

Poladpur Rural Roads
Palghar News : पालघर तालुक्यातील नागझरीच्या सरपंचांना पदावरून हटवले

या मार्गाला पर्याय असलेल्या मेढे घाट मार्गे पुणे हा मार्ग सुद्धा लालफितीत अडकला आहे तर वरंध घाटची दुरुस्ती व रुंदीकरण चे काम सुरू आहे पावसाळ्यात सदरचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता आजही एसटी बसेस या मार्गावर बंद आहेत हे या मुले अनेक प्रवासी वर्गाला द्राविडी प्रणाम घालत प्रवास करावा लागत आहे.

तालुक्यातील कामथे पर्यत चा रस्त्याचे डांबरीकरण झाले असून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सह खासगी वाहने कामथे गावापर्यत ये जा करत आहेत कामथे ते पुणेजिल्ह्यातील हिर्डोशी या मार्गावरील 10 किमीचा रस्ता डोंगरातून ,घाटमार्गातून करावा लागणार आहे त्यासाठी करोडो रुपये खर्ची पडणार असले तरी ग्रामीण भागातील रस्ते एकमेकांना जोडल्यास गावातील अर्थकारण विकासात्मक बदल निश्चित होणार आहेत मात्र मोठ्या शहराकडे विकासाची गंगा वाहत असताना शासनाचे ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष मारक ठरत आहे.

Poladpur Rural Roads
Kasadi River Pollution : कासाडी नदीच्या प्रदुषणाने मत्‍स्‍यजीवन धोक्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.