BEST Driver Overtime Ban: बेस्टच्या कंत्राटी चालकांचा 'ओव्हर टाईम' बंद होणार; बेस्ट समिती अध्यक्ष विश्वासराव यांची माहिती

अशात काही कंत्राटी चालक पगार कमी असल्यामुळे दोन शिफ्ट करतात.
BEST BMC Merger
BEST BMC MergerPudhari
Published on
Updated on

मुंबई: बेस्ट परिवहन सेवेमधील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या कंत्राटी चालकांचा अमर्याद 'ओव्हर टाईम' बंद करण्याचे ठरवले आहे. नवीन शिफ्ट हवी असल्यास कंत्राटी चालकांना बेस्टच्या निवारा केंद्रात सक्तीची विश्रांती घेणे यापुढे बंधनकारक करण्यात येणार आहे.

बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरच्या बेस्ट अपघातानंतर कंत्राटी बस चालकांना अमर्याद 'ओव्हर टाईम' दिला जात असल्याची बाब पुढे आली आहे. अशात काही कंत्राटी चालक पगार कमी असल्यामुळे दोन शिफ्ट करतात.

BEST BMC Merger
Navi Mumbai Unauthorized Constructions: अनधिकृत बांधकामांना पुन्‍हा नोटिसा

मात्र, या दरम्यान किमान ९ तासांची सक्तीची विश्रांती न घेता कंत्राटी चालक खाजगी वाहतूक सेवा किंवा स्वतःच्या वाहनावर काम करत असतात आणि पुन्हा बेस्टच्या शिफ्टवर काम करण्यास येतात.

BEST BMC Merger
Mumbai Drain Cleaning: नालेसफाईत एआयने शोधल्‍या त्रुटी

त्यामुळे शरीराला विश्रांती न मिळाल्याचे परिणाम चालकांचा कामावर दिसून येत आहेत. त्यामुळे यापुढे बेस्ट मधील चालकांचा अमर्याद 'ओव्हर टाईम' बंद केला जाणार असून चालकांना बेस्ट आगारातील निवारा केंद्रात सक्तीची विश्रांती घेणे बंधनकारक असेल. तरच त्याला नवीन शिप्ट दिली जाणार असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news