Neville Dsouza Football Ground: अखेर नेव्हिल डिसोझा मैदानाचे आरक्षण बदलले; आणखी एक मैदान इतिहासजमा

या निर्णयामुळे शहरातील आणखी एका खुल्या सार्वजनिक जागेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Neville Dsouza Football Ground
Neville Dsouza Football GroundPudhari
Published on
Updated on

मुंबई: वांद्रे रिक्लमेशन येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावरून मंगळवारी रात्री महापालिका राजकारणात रंगत आली. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने या मैदानाचे आरक्षण क्रीडांगणावरून बदलून कन्व्हेन्शन आणि प्रदर्शन केंद्र करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

या निर्णयामुळे शहरातील आणखी एका खुल्या सार्वजनिक जागेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा मुद्दा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक २२ अंतर्गत उपस्थित करण्यात आला.

Neville Dsouza Football Ground
NMC One Nation One License: डॉक्टरांना देशभर कुठेही प्रॅक्टिस करता येणार! प्रत्येक डॉक्टरला युनिक आयडी

हा प्रस्ताव सुधारणा समितीच्या अध्यक्षा आणि शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी मांडला होता. सभागृहात भाजप- शिवसेना नगरसेवकांचे बहुमत असल्याने या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

उबाठाच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. विरोधी सदस्यांनी आरोप केला की, मुंबईत खुल्या मैदानांची आणि सार्वजनिक जागांची संख्या सातत्याने कमी होत असतानाही, सध्याचे क्रीडांगण व्यावसायिक आणि कार्यक्रमांसाठी पुन्हा आरक्षित केले जात आहे. नेव्हिल डिसोझा मैदान क्रीडांगण म्हणून कायम ठेवावे, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती.

Neville Dsouza Football Ground
FDA Action on Hotels and Restaurants: मुंबईत FDA ची मोठी कारवाई! सहा हॉटेल, क्लबचे परवाने निलंबित

मुलांनी कुठे खेळायचे?

वांद्रे मतदारसंघातील काँग्रेस नगरसेवक राजा रहबर खान म्हणाले की, हे मैदान स्थानिक नागरिकांसाठी फार पूर्वीपासून महत्त्वाचे आहे. पिढ्यानपिढ्या मुले आणि तरुण तिथे क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होत आले आहेत.

जवळपास २०० स्थानिक क्लब या मैदानाशी संलग्न आहेत. त्यामुळे, आरक्षणात बदल केल्यास त्याचा थेट परिणाम स्थानिक खेळाडू आणि क्रीडा उपक्रमांवर होईल.

काँग्रेस गटाचे नेते अश्रफ आझमी यांनीही या प्रस्तावाला विरोध केला आणि सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना महापालिका प्रशासन आरक्षणात बदल करण्याची प्रक्रिया कशी पुढे नेऊ शकते?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news