Maharashtra Farmer News | हेक्टरी 50 हजारांची मदत तातडीने करा : बाळासाहेब थोरात

Agricultural Compensation | काही पिके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले. केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Crop Loss Help
Balasaheb Thorat(File photo)
Published on
Updated on

Crop Loss Help

मुंबई : आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. म्हणून सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

काही पिके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले. केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, टोमॅटो, कांदा, डाळिंब पिकाचेही नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली. जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, शेतकरी मोडून पडला आहे. पण सरकारची मदत करण्याची मानसिकता दिसत नाही.

Crop Loss Help
Mumbai Zepto License Suspended: एफडीएने झेप्टोचा अन्न परवाना निलंबित का केला?

एनडीआरएफच्या निकषाने मदत करायची की एसडीआरएफच्या निकषाने यात शेतकर्‍याला काही देणेघेणे नाही, त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे. सरकारने 3 हेक्टरचा निकष बदलून 2 हेक्टर केला हे आणखी अन्यायकारक आहे, असे थोरात यांनी सांगितले.

Crop Loss Help
Maharashtra Farmer News | अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जुन्या निकषानुसार भरपाई

पीकविम्याचे निकष बदलल्याने त्यातूनही फारशी मदत मिळत नाही. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले, पण प्रत्यक्षात प्रशासन काम करताना दिसत नाही. आज कांद्याला एकरी 60 हजार रुपये खर्च येतो, तर टोमॅटोला एकरी 50 हजारांचा खर्च येतो. शेती करणे महाग झाले आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news