Mumbai Crime : बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणीचा प्रयत्न

जुहू पोलिसांकडून तोतया इसमावर गुन्हा दाखल, आधारकार्ड पडताळणीत झाले उघड
Illegal property registration attempt
बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणीचा प्रयत्नpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या आधारे फसवणूक करून घराची पॉवर ऑफ ॲटर्नी नोंदवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतया इसमाला जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना अंधेरी पश्चिम येथील दुय्यम निबंधक कार्यालयात 29 जानेवारी 2026 रोजी घडली.

तक्रारदार पांडुरंग शेलार हे अंधेरी पश्चिम येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात सह दुय्यम निबंधक वर्ग-2 म्हणून कार्यरत आहेत. 29 जानेवारी रोजी दुपारी मोहम्मद रफीक मोहम्मद इलीयास (वय 62) हा इसम आंबिवली येथील एका सदनिकेचे कुलमुख्यत्यारपत्र (फ्लॅटची पॉवर ऑफ ॲटर्नी) नोंदवण्यासाठी कार्यालयात आला होता. त्याच्यासोबत दस्त लिहून घेणारा सुराबदीन मंडल आणि दोन साक्षीदारही होते.

Illegal property registration attempt
‌SRA investment fraud case : ‘एसआरए‌’त गुंतवणुकीच्या आमिषाने चौदा कोटींचा गंडा

नोंदणी प्रक्रिया सुरू असताना शेलार यांनी जेव्हा आधारकार्डची संगणकावर पडताळणी केली, तेव्हा मोहम्मद रफीकऐवजी सलाउद्दीन आदम नाईक असे नाव समोर आले. संशय आल्याने त्यांनी पॅनकार्डची तपासणी केली असता तेदेखील बनावट असल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता समोर आलेला इसम हा तोतया असून त्याने आपली खरी ओळख लपवल्याचे स्पष्ट झाले.

सरकारी कामात फसवणूक करण्याचा आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड होताच, शेलार यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. जुहू पोलिसांनी याप्रकरणी सलाउद्दीन आदम नाईक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4), 319(2) आणि 62 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय अच्युतराव राडकर करत आहेत.

Illegal property registration attempt
Anganwadi workers protest : प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडीसेविका आक्रमक
  • नागरिकांनी दस्त नोंदणी करताना मालमत्तेची कागदपत्रे मूळ आणि खरी असल्याची खात्री दुय्यम निबंधक कार्यालयाकडून करूनच दस्त नोंदणी करण्यात यावी, तसेच त्याबाबत कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे. संशयास्पद किंवा अपूर्ण कागदपत्रे आढळल्यास व्यवहार टाळा आणि त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन सहजिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news