पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यांचे आव्हान स्वीकारत अजित पवार यांनी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास अंजली दमानिया यांना संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान दिले होते. आता दमानिया यांनीही 'चॅलेंज मंजुर आहे' असे म्हणत त्यांचे प्रतिआव्हान स्विकारले आहे.
अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवार नार्को टेस्ट करायला तयार आहेत, असे माध्यमातून कळले. अग्रवाल कुटुंबाशी माझा काही संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फोन केला नाही, असे सिद्ध झाले. तर अंजली दमानियांनी घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा, असे अजित पवार (Anjali Damania Vs Ajit Pawar) म्हणाले.
यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चॉलेंज स्वीकारत "मी गप्प घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा" हे मला पूर्णपणे मान्य असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे कधी नर्को टेस्ट करताय ते लवकरात लवकर कळवा, नार्को टेस्ट चे प्रश्न मी पाठवेन, असे अंजली दमानिया यांनी अजित पवारांना (Anjali Damania Vs Ajit Pawar) विचारले आहे.
हेही वाचा: