Mumbai redevelopment project : अंधेरीतील झोपडपट्टी समूह पुनर्विकासातून होणार तब्बल २८,०६१ पुनर्वसन सदनिकांची निर्मिती

बर्फीवाला मार्ग परिसराची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड
Mumbai redevelopment project
अंधेरीतील झोपडपट्टी समूह पुनर्विकासातून होणार तब्बल २८,०६१ पुनर्वसन सदनिकांची निर्मितीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दिशेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) महत्त्वपूर्ण पाऊलले असून, त्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून निवडलेल्या अंधेरीतील झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेतून तब्बल २८,०६१ पुनर्वसन सदनिकांची निर्मिती होणार आहे. याशिवाय खुल्या जागा, खेळाची मैदाने, शाळा, आरोग्य सुविधा व इतर मूलभूत सोयी-सुविधांचा नियोजनबद्ध विकास देखील होणार असल्याचे एसआरएकडून सांगण्यात आले.

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला मार्ग परिसरातील समूह क्षेत्राची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड केली आहे. या प्रकल्प क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ १०१.३६ एकर असून, त्यापैकी ६१.४० एकर क्षेत्र झोपडपट्टीव्याप्त आहे.

Mumbai redevelopment project
Virar Alibag corridor construction: विरार-अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा

हे क्षेत्र सांताक्रूझ विमानतळाच्या लगत असल्याने बांधकाम उंचीवरील मर्यादा, झोपड्यांची प्रचंड घनता आणि तुकड्या-तुकड्यांत विभागलेल्या पुनर्वसन योजनांमुळे हा प्रकल्प दीर्घकाळ रखडला होता. परिणामी हजारो झोपडीधारकांचे पुनर्वसनही खोळंबले होते. अनेक झोपडीधारकांचे स्थलांतराचे भाडे देखील प्रलंबित आहे. आता मात्र समूह पुनर्विकास प्रकल्पांमुळे हा तिढा सुटणार आहे.

या प्रकल्पासाठी बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्ती करण्यासाठी एप्रिलमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांचे तांत्रिक लिफाफे गुरुवारी उघडण्यात आले. या निविदांना मिळालेल्या प्रतिसादाने एसआरएकडे गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलल्याचे स्पष्ट होते.

गृहनिर्माण क्षेत्रातील मोठ्या खाजगी कंपन्यांनी या निविदांमध्ये प्रतिसाद नोंदविला. त्यात शापूरजी पालनजी रिअल इस्टेट, रिलायंस ४१ R रियलीटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि जेएसडब्लू रियलीटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आदी नामांकित खाजगी गृहनिर्माण क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे. सध्या प्राप्त प्रस्तावांची तांत्रिक छाननी सुरू असून, उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने निविदाकारांचे आर्थिक निविदा उघडण्याचे नियोजन आहे.

त्यानंतर शासन मान्यतेने प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होऊन प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की, प्राधिकरणाच्या इतिहासामध्ये प्रथमच पूर्ण पादर्शकता, स्पर्धात्मक निविदा प्रक्रीया आणि LOI ट्रेडींगला पूर्ण विराम देणारी प्रणाली राबविण्यात आली.

सामाजिक व नैतीक बांधिलकीची जाणीव ठेऊन कॉर्पोरेट क्षेत्रही या प्रक्रियेत सहभागी होत असून झोपडपट्टीवासीयांना अधिक चांगले व सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेत आहे.

Mumbai redevelopment project
Milindnagar SRA Scam: मिलिंदनगर एसआरए प्रकरण तापले; एसआयटी चौकशीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
  • अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेतून तब्बल २८ हजार ६१ पुनर्वसन सदनिकांची निर्मिती होईल.

  • या प्रकल्पात सुमारे १४ हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार असून, अतिरिक्त १४,०६१ पुनर्वसन घरे देखील उपलब्ध होतील.

  • याशिवाय नागरिकांसाठी खुल्या जागा, खेळाची मैदाने, शाळा, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांचा समावेश असलेला एकात्मिक व शाश्वत विकास साध्य होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "झोपडपट्टीमुक्त मुंबई" या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक दूरगामी पाऊल होय. याच धर्तीवर प्राधिकरणाने बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध समूह क्षेत्रांचा अभ्यास करून अन्य १८ समूह क्षेत्रे निश्चित केली आहेत. या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या किंवा अव्यवहार्य ठरलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती मिळणार असून, सुमारे ६ ते ७ लाख झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्यातून शक्य होईल.

डॉ. महेंद्र कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news