Mumbai Watch Theft: खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यानेच केला 17 लाखांच्या महागड्या वॉर्चेसचा डल्ला; एमआयडीसी पोलिसांकडून अटक

टॅग प्रिंटिंग व इन्व्हेंट्री रुमची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याची हातसफाई सीसीटीव्हीत उघड; बहुतेक मुद्देमाल हस्तगत
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

मुंबई : सुमारे सतरा लाखांच्या महागड्या वॉर्चेसची चोरी केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सुमीत अमरजीत कुर्मी असे या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा बहुतांश मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले. काम करताना त्याने टप्प्याटप्प्याने हातसफाई हातसफाई केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Arrest
Land Acquisition: भूसंपादनाच्या मोबदल्यात टीडीआर लादता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालयाचा एमएमआरडीएला आदेश

28 वर्षांची तक्रारदार महिला ठाण्यातील रहिवाशी आहे. सध्या ती अंधेरीतील एका खाजगी कंपनीत एचआर म्हणून कामाला आहे. ही कंपनी वॉर्चेस ॲक्सेसरीज, स्मॉल लेदर गुड्स आदीचे ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय करते. कंपनीत 53 कर्मचारी असून त्यात सुमीत कुर्मीचा समावेश ाहे. त्याच्यावर टॅग प्रिटींग आणि इन्वेंट्री रुममधील मालाची ने-आण करण्याची जबाबदारी होती.

Arrest
New Income Tax Law 2026: नवा आयकर कायदा 2026 : शब्द कमी, सुलभता जास्त; करदात्यांसाठी मोठा बदल

22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी त्यांनी वॉर्चेस ॲक्सेसरीज, स्मॉल लेदर गुड्स असा मुद्देमाल इन्वेंट्री रुममध्ये ठेवला होता. 20 जानेवारीला तेथून काही वॉर्चेस आणण्यासाठी दोन महिला कर्मचारी गेल्या होत्या. यावेळी त्यांना इन्वेंट्री रुममध्ये काही वॉर्चेस मिसिंग असल्याचे दिसून आले. यावेळी रुमच्या सर्व वॉर्चेसची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत विविध 16 लाख 74 हजार 534 रुपयांचे 36 वॉर्चेस चोरीस गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ती माहिती कंपनीच्या मालकाला देण्यात आली होती. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशीसह सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

Arrest
Youth Focused Union Budget: ‘बोर’ नसलेला अर्थसंकल्प : मिलेनिअल्स-जेन Z साठी AI, क्रिएटिव्ह करिअर आणि स्वस्त ग्लोबल लाईफस्टाईल

या घटनेनंतर त्यांनी सुमीत कुर्मी याच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. यावेळी सुमीत हा त्याच्या पॅण्टच्या खिशातून वॉर्चेस घेऊन जात असल्याचे दिसून आले. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आला. या प्रकारानंतर त्याची तक्रारदार महिलेने चौकशी केली. यावेळी त्याने वॉर्चेस चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news