Andheri Police Inspector Transfer: महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर अंधेरीच्या वरिष्ठ निरीक्षकांची बदली; पोलीस दलात चर्चा

अंधेरीच्या वरिष्ठ निरीक्षकांची बदली होताच वाजवले फटाके; आणखी सहा अधिकाऱ्यांना हटविण्याची धमकी
Andheri Police Inspector Transfer
Andheri Police Inspector TransferPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: कायद्याचा धाक दाखवणाऱ्या खाकी वर्दीच्या दलातच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कथित दबदब्याची चर्चा रंगू लागली आहे. तिच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची बदली झाल्याचा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे, बदलीचे आदेश निघताच संबंधित महिला कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय पोलीस दलात चर्चेचा बनला आहे.

अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची १३ नोव्हेंबर रोजी विशेष शाखा-१ मध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अजय कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. मच्छिंद्र यांची अंधेरीतील १८ महिन्यांची सेवा झाली होती. पदोन्नतीसाठी अवघे सहा महिने शिल्लक असताना झालेल्या या बदलीमुळे पोलीस वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Andheri Police Inspector Transfer
Kurla Garden Assault Case Update: कुर्ला उद्यानातील मारहाणप्रकरणी सहा अल्पवयीन ताब्यात; दोन मुले अद्याप फरार

मच्छिंद्र यांची व्यथा; आपली बाजू ऐकलीच नाही!

मच्छिंद्र यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित महिला कर्मचाऱ्याने आपल्याला लक्ष्य केल्याचा आरोप केला. संबंधित महिलेच्या कामकाजाबाबत आणि ड्युटीच्या जबाबदाऱ्यांबाबत आपण वरिष्ठांकडे चार अहवाल पाठविला होता.

त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तिला ड्युटी दिल्यास आपल्यावर कारवाई होईल, अशी धमकी तिने दिली होती. तिच्या तक्रारीनंतर आपली बदली करण्यात आली; मात्र आपली बाजू ऐकून घेण्यासाठी कोणतीही विभागीय चौकशी झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

Andheri Police Inspector Transfer
BMC Manhole Contract: मुंबईत तुटलेली, गायब झालेली मॅनहोलची झाकणे बदलणार; पालिकेचा १.१० कोटींचा प्रस्ताव

दरम्यान, संबंधित महिला कर्मचारी यापूर्वी निर्मल नगर आणि मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत होती आणि कामचुकारपणा लपविण्यासाठी तिथे वरिष्ठाना धमकावण्याचे प्रकार केल्याचे बोलले जाते.

ड्युटीवर काम सांगितल्यास आत्महत्येची धमकी देणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईची भीती दाखवणे आणि पती आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून दबाव आणणे, या तिच्या आरोपांची पोलीस दलात उलटसुलट चर्चा आहे.

कथित वरदहस्ताची चर्चा

महिला कर्मचाऱ्याला आयपीएस अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची आणि मंत्रालयातील वरिष्ठ स्तरावरून संरक्षण मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पोलीस वर्तुळात तिला उपरोधिकपणे 'खाकीतील बिपाशा बासू' असे संबोधले जाते. महागडी सौंदर्य प्रसाधने, गणवेश व्यक्तिरिक्त ब्रँडेड कपडे, हॉटेलमधील जेवण हा खात्यातील सहकाऱ्यांमधील चर्चेचा विषय असायचा.

सोशल मीडियावर तिच्या अकाऊंटवर असलेले फोटोसुद्धा एखाद्या अभिनेत्रीच्या अदाकारीला शोभणारे आहेत,अशी पोलीस खात्यात कुजबुज ऐकायला मिळते. पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या खासगी आयुष्यात कसे वागायचे हा समाजातील चौकटीतील ज्याचा त्याचा विषय असला तरी, आपल्या सौंदर्याच्या बळावर शिस्तीच्या पोलीस खात्यात नवा पायंडा पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.