Kurla Garden Assault Case Update: कुर्ला उद्यानातील मारहाणप्रकरणी सहा अल्पवयीन ताब्यात; दोन मुले अद्याप फरार

उर्वरित दोघे ११ वर्षांखालील असल्याची माहिती; शोधासाठी घाटकोपर पोलिसांची दोन पथके, आठही मुलांच्या पालकांना नोटिसा
Mumbai Kurla viral video
Mumbai Kurla viral videoFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील प्रमोद महाजन उद्यानात तरुण-तरुणीला हॉकी स्टिक, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असले, तरी अन्य दोन मुले अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत.

विशेष म्हणजे ही दोन्ही मुले ११ वर्षांखालील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी घाटकोपर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आठ मुलांच्या पालकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात २० नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. २१ वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसह उद्यानात गेला होता.

दोघे छायाचित्रे काढत असताना तेथे आलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. तरुणाला हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणीलाही मारहाण करण्यात आली होती.

Mumbai Kurla viral video
Mumbai Well Water Restrictions: विहिरींतील पाणी उपशावर येणार निर्बंध! पाणी वापरासाठी पालिकेची परवानगी होणार बंधनकारक

दोन पथकांकडून शोधमोहीम

या प्रकरणात आठ अल्पवयीन मुलांची ओळख पटवून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी सहा मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. मंडळाने त्यांची ४ डिसेंबरपर्यंत बालनिरीक्षणगृहात रवानगी केली आहे. मात्र, उर्वरित दोन मुले अद्याप सापडलेली नाहीत.

ही दोन्ही मुले ११ वर्षांखालील असून, संबंधित मुलांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी दोन पोलीस पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, या घटनेत सहभागी असलेल्या आठही मुलांच्या पालकांना घाटकोपर पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. अल्पवयीन मुलांच्या वर्तनावर पालकांचे लक्ष होते का, त्यांच्यात यापूर्वी काही वाद झाले होते का, तसेच मारहाणीमागील नेमके कारण काय होते, याची माहिती पोलीस घेत आहेत.

Mumbai Kurla viral video
Mumbai Temperature Drop: मुंबईत थंडीची चाहूल; किमान तापमान १६.२ अंशांवर, हंगामातील नीचांकी नोंद

राजावाडी रुग्णालयातून घरी जाण्याचा सल्ला

मारहाणीत जखमी झालेल्या तरुण आणि तरुणीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर दोघांनाही घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.