BMC Office Ceiling Collapse: अंधेरीत सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाचा कोसळला स्लॅब; महापालिकेचे २७ कोटी पाण्यात

नवीन प्रभाग कार्यालयाच्या कामासाठी फर्निचर आणि इतर वस्तूसाठी जवळपास खर्च करण्यात आलेले २७ कोटी रूपये पाण्यात गेले आहेत.
BMC Office Ceiling Collapse
BMC Office Ceiling CollapsePudhari
Published on
Updated on

जोगेश्वरी: मुंबई महापालिकेच्या अंधेरी पूनम नगर येथील के उत्तर प्रभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाचा पहिल्याच पावसात सीलिंग स्लॅब कोसळण्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत सुदैवाने कार्यालयातील कर्मचारी थोडक्यात बचावले.

दरम्यान, नवीन प्रभाग कार्यालयाच्या कामासाठी फर्निचर आणि इतर वस्तूसाठी जवळपास खर्च करण्यात आलेले २७ कोटी रूपये पाण्यात गेले आहेत.

BMC Office Ceiling Collapse
Bhandup Gas Leak Fire: भांडुपमध्ये गॅसगळतीमुळे आग, ३ जण भाजले; देखभाल दुरुस्ती करत असताना घडली घटना

मागील काही महिन्यापूर्वीच या नवीन महापालिकेचे प्रभाग कार्यालय सुरू करण्यात आले होते. पालिकेच्या परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयातील सीलिंग सुद्धा कोसळल्याचे पाहायला मिळत आहे.

नवीन प्रभाग कार्यालयाचे काम पालिकेच्या परिरक्षण विभागाच्या अंतर्गत खाजगी कंत्राटदारामार्फत करण्यात आले होते. नवीन प्रभाग कार्यालयात मोठ्या प्रमाणात फर्निचरचे काम करण्यात आले आहे. या फर्निचरसाठी वापरण्यात आलेल्या साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहायला मिळत आहे.

BMC Office Ceiling Collapse
Ashadhi Wari Kumkum Bukka Sales: कुंकू अन् बुक्क्यालाही चढतो विठ्ठल भक्तीचा रंग; आषाढीत होते दहा ते बारा कोटींची उलाढाल

महापालिकेच्या वतीने तिसरा, चौथा आणि पाचव्या मजल्यावर काम करण्यात आले. नवीन प्रभाग कार्यालयासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच खराब झाले.

कंत्राटदारावर कारवाईची मागणी

दरम्यान, या निकृष्ट दर्जाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागामार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटदारावर महापालिका आयुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news