Ashadhi Wari Kumkum Bukka Sales: कुंकू अन् बुक्क्यालाही चढतो विठ्ठल भक्तीचा रंग; आषाढीत होते दहा ते बारा कोटींची उलाढाल

गोपीचंदन अष्टगंधलाही वारकऱ्यांची मागणी
Ashadhi Wari Kumkum Bukka Sales
Ashadhi Wari Kumkum Bukka SalesPudhari
Published on
Updated on

स्वप्निल कुलकर्णी

मुंबई: आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक सौभाग्यलंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतात. यात्रा काळात मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने सजतात.

त्यामुळे कुंकू अन् बुक्क्यालाही विठ्ठल भक्तीचा रंग चढल्याचे चित्र आषाढी यात्रा काळात पाहायला मिळते. आषाढीत दरवर्षी आठ टन कुंकू, बुक्का, अष्टगंधची विक्री होत असून, त्यामधून १० ते १२ कोटींची उलाढाल होत असल्याचे कुंकू, बुक्का विक्रेत्यांनी सांगितले.

Ashadhi Wari Kumkum Bukka Sales
Devkund Waterfall Incident: देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक गेले वाहून; पोलिसांना चकवा देवून पोहोचले धबधब्यावर

पंढरपूरमध्ये कुंकू, बुक्का बनविणारे दहा ते बारा कारखाने आहेत. आषाढी वारीच्या आधी किमान तीन महिने तयारी सुरू होते. केममधून कुंकू येते. येथील कारखानदार जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून तयारीला लागलेले असतात.

येणारे भाविक कुंकू खरेदी करताना हळदीपासून बनवलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवाला पसंती देत असल्याने हे पहिल्या दर्जाचे कुंकू पंढरपूरमध्येच मोठ्या प्रमाणात बनवले जाते. महिला भाविक आषाढी वारी संपन्न झाल्यावर गावी जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदन खरेदी करतात.

बुक्का हे विठ्ठलाच्या चरणधुळीचे प्रतीक आहे. बुक्का दोन प्रकारचा असतो. काळा बुक्काकोळशाची पूड, चंदन पूड, तुळशीच्या काड्यांची पूड, नागरमोथा, दवणा, मरवा वापरून तयार केला जातो.

Ashadhi Wari Kumkum Bukka Sales
Poladpur Mahabaleshwar Road Closed: महाबळेश्वरला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! पोलादपूर घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद

कापूर, चंदन, दवणा, देवदार, लवंग, वेलची गव्हलाकचोरा, वाळा याची पूड करून पांढरा बुक्का तयार केला जातो. त्याला अबीर असे म्हणतात. गोपीचंदन हे सुगंधित मुलतानी मातीसारखे असते. ते पाण्यात कालवून लावता येते.

असे आहेत दर

हळद : २०० रुपये किलो

कुंकू : २०० रुपये किलो

अष्टगंध : २०० रुपये किलो

बुक्का : २०० रुपये किलो

हलक्या दर्जाचे स्वस्तातील कुंकू राज्यभरातून येत असले तरी हळदीच्या व स्टार्चपासून बनवलेल्या कुंकवास भाविकांकडून मोठी मागणी असते. कुंकू, हळद, बुक्का यासोबत चंदनाच्या सुगंधी अष्टगंधाला खूप मागणी आहे.

- सुधीर लाड कुंकू आणि प्रासादिक विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news