अजित पवार यांनी आता आमदारकीचेच स्वप्न पाहावे

'ते' स्वप्न भंगले
Ajit Pawar
अजित पवार यांनी आता आमदारकीचेच स्वप्न पाहावेFile Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सोडून भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाऐवजी आता आमदारकीचेच स्वप्न पाहावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लगावला आहे.

या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करून आपल्याला मुख्यमंत्री करतील, असेही स्वप्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. आता ते स्वप्न भंगले आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ७० ते ८० जागांपर्यंतच मजल मारता येणार आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे सोडून दिलेले बरे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news