

Ajit Pawar Maharashtra politics |
मुंबई : राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावी असे सर्वांना वाटते. पण ते अद्याप शक्य झालेले नाही. त्यानुसार कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटत आहे. पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. वरळी येथे आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात महिलांना संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी चांगला निर्णय घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. अनेक महिलांचे कर्तृत्व राज्याने पाहिले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत, पण मनभेद होता कामा नये. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही यावेळी भाषण झाले. ते म्हणाले, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महिलांना सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. तुमच्या पुरस्काराने आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नाव आणि मराठी संस्कृतीची जगभरात ओळख निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द कोणी दिला? मी दिला का? असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पत्रकारांनाच विचारला. यावर पत्रकारांनी महायुतीचे हे आश्वासन होते म्हणताच त्यावर कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही. चंदगड येथे शेतकरी मेळाव्यासाठी आलेले अजित पवार यांनी शिनोळी येथे पत्रकारांशी चर्चा केली.
कर्जमाफीबाबत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रत्यय अजित पवार यांच्या विधानावरून येतो, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी केला.