Ajit Pawar
'मविआ' आणि 'महायुती'मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळालीPudhari Photo

अजित पवारांच अर्थसंकल्पावरील टीकेला उत्तर; म्हणाले, "हाथ मिलाओ..."

'मविआ' आणि 'महायुती'मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेकांनी अर्थसंकल्पामधील अनेक त्रुटी सांगितल्या. त्यामधील सांगितलेल्या त्रुटींवर आम्ही सामुहिकपणे चर्चा केली. पण विरोधकांच कामच आहे विरोध करणे, अशा शब्दात अर्थसंकल्पावरील टीकेला उत्तर देताना विरोधकांवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.

काय म्हणाले अजित पवार?

  • 'मविआ' आणि 'महायुती'मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.

  • अर्थसंकल्प मांडण्याचा मला १० वर्षांचा अनुभव.

  • विरोधकांच कामच आहे विरोध करणे.

  • हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना बळ देणारा आणि महिलांना सक्षम करणारा.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.२८) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) सादर केला. त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या. या अर्थसंकल्पानंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

विरोधकांच कामच विरोध करणे : अजित पवार

आज पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस. आजच्या अधिवेशन दरम्यान अजित पवार यांनी विरोधकांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, " विरोधकांच कामच आहे विरोध करणे. शेतकऱ्यांना बळ देणारा आणि महिलांना सक्षम करणारा हा अर्थसंकल्प होता. सर्वांचा विचार करुन, सर्वांच्या विकासाचा विचार करुन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अनेकांनी अर्थसंकल्पामधील अनेक त्रुटी सांगितल्या. त्यामधील सांगितलेल्या त्रुटींवर आम्ही सामुहिकपणे चर्चा केली. त्याचबरोबर माझ्या विभागालाही काही दुरुस्त्या सांगितल्या.

'मविआ' आणि 'महायुती'मध्ये अर्थसंकल्प सादर केला

अजित पवार म्हणाले, "मी महाविकास आघाडी आणि महायुतीदरम्यान अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. अर्थसंकल्प मांडण्याचा मला १० वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ मला काहीतरी अनुभव असेल. एकाकडून अर्थसंकल्प मांडला की दुसरे विरोध करताताच." यंदाचा अर्थसंकल्प  कुठेही फुटलेला नाही. असेही ते म्हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news