Air India ticket price hike : इंधन दरवाढीचा फटका; एअर इंडियाची तिकिटे महागली

टाटा कंपनीने वाढवला इंधनावरचा सरचार्ज
Air India ticket price hike
इंधन दरवाढीचा फटका; एअर इंडियाची तिकिटे महागलीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : इंधनावरचा सरचार्ज वाढवल्यामुळे एअर इंडियाच्या विमानांची तिकिटे महागणार आहेत. नवे दर आज (8 एप्रिल) रात्री 12 वाजल्यानंतर लागू होणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसतर्फे ज्या विमानांचे उड्डाण होते त्या विमानांच्या तिकिटांचे दरही वाढणार आहेत.

बांगलादेश, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया येथील उड्डाणासांठी विमानाच्या तिकिट दरांमध्ये एअर इंडियाने फ्युएल चार्ज वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांवरील इंधन अधिभारातही सुधारणा करण्यात आली असून ज्यामुळे तेथील तिकीट दरांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Air India ticket price hike
Jet Fuel Shortage: विमान कंपन्यांवर इंधन संकटाची टांगती तलवार; जगभरातील एअरलाईन्स ठप्प होणार? कंपन्या संकटात

27 मार्च 2026 रोजी संपलेल्या आठवड्यासाठी जेट इंधनाची सरासरी जागतिक किंमत फेब्रुवारीच्या अखेरीस असलेल्या 99.40 रुपये प्रति बॅरलवरून वाढून 195.19 रुपये प्रति बॅरल झाली. विमान इंधनाचा खर्च केवळ कच्च्या तेलामुळे (क्रूड ऑइल) नाही, तर रिफायनिंग मार्जिन वाढल्यामुळेही वाढला आहे. एअरलाइनने निवेदनात म्हटले आहे की, “वाढलेला अधिभार इंधनाच्या वाढलेल्या संपूर्ण खर्चाची भरपाई करत नाही.

Air India ticket price hike
Air Travel Gets Costlier | एअर इंडियाकडून इंधन अधिभारात वाढ, तिकीट दर कडाडणार

कंपनी अजूनही या भाराचा काही भाग स्वतः उचलत आहे.” जेट इंधनाच्या किमती वाढल्यामुळे जगभरातील एअरलाईन्सनी केवळ तिकिटांचे दर वाढवले नाहीत, तर त्यांचे भविष्यातील आर्थिक अंदाज देखील मागे घेतले आहेत. एअरलाईन्ससाठी जेट-इंधन हा सर्वात मोठा खर्च असतो. एकूण ऑपरेटिंग खर्चात याचा वाटा 30% ते 40% असतो.

नवीन दर

  • 0 ते 500 किमी : 299 रु

  • 501 ते 1,000 किमी : 399 रु

  • 1,001 ते 1,500 किमी : 549 रु

  • 1,501 ते 2,000 किमी : 749 रु

  • 2,000 किमी पेक्षा जास्त : 899 रु

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news