Saudi Arabia Flights: एअर इंडियाचा मोठा निर्णय! सौदी अरेबियासाठीची विमानसेवा २० ऑक्टोबरपर्यंत बंद

प्रवाशांना पूर्ण परतावा मिळणार
 Nagpur Air India Delhi Mumbai Flights
Air India FlightsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सौदी अरेबियात हौथी बंडखोरांकडून सुरू असलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने सौदी अरेबियाला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे आता मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सेवा १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आली होती.

एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देताना स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून रियाध, दम्माम आणि जेद्दाह मार्गावरील उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत.

 Nagpur Air India Delhi Mumbai Flights
Sachin Vaze Bail News: सचिन वाझेला जामीन मिळणार की नाही? उच्च न्यायालयाचा निकाल राखून

विमान कंपनी तेथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून परिस्थिती सामान्य झाल्यावरच सुरक्षितपणे सेवा पुन्हा सुरू केली जाईल. तसेच रद्द झालेल्या विमानांमधील सर्व प्रवाशांना कोणताही अतिरिक्त भार न लावता पूर्ण परतावा देण्याची हमी कंपनीने दिली आहे.

भारतीय विमान कंपन्यांची कठोर पावले

केवळ एअर इंडियाच नव्हे, तर भारतातील इतर प्रमुख विमान कंपन्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणे लांबणीवर टाकली आहेत. इंडिगोने गुरुवारीच सौदी अरेबियाची उड्डाणे २४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याची घोषणा केली होती.

 Nagpur Air India Delhi Mumbai Flights
FDA Vacant Posts: एफडीएच्या धाडी वाढल्या, मात्र अपुरे मनुष्यबळ; २१३ पदे रिक्त

त्याचप्रमाणे आकासा एअरने रियाधसाठी २४ ऑक्टोबरपर्यंत आणि जेद्दाहसाठी २१ ऑक्टोबरपर्यंतची सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. येमेनमधील हौथी बंडखोरांनी थेट विमानतळांना लक्ष्य केल्यामुळे हवाई सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news