

Acharya Devvrat
मुंबई : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्याने राज्याच्या राज्यपालपदाचा कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार देवव्रत यांनी आज (दि. १५) पदभार स्वीकारला असून, राजभवनात त्यांनी शपथ घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. रविवारी दुपारी तेजस एक्स्प्रेसने देवव्रत हे पत्नी दर्शना देवी यांच्यासह मुंबईत दाखल झाले होते. रेल्वे स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राज्यपालांचे आगमन होताच मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर देवव्रत यांचा ताफा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राजभवन येथे दाखल झाला.