Minor Girl Abuse Case: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार; आरोपी प्रियकराला अटक

मे २०२३ ते जून २०२६ या कालावधीत लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला.
Girl Molestation
Girl Molestationfile photo
Published on
Updated on

मुंबई: लग्नाच्या आमिषाने तीन वर्षांत अल्पवयीन प्रेयसीवर तिच्याच प्रियकराने अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी व आरोपी गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहतात. तीन वर्षापूर्वी पीडित मुलगी पंधरा वर्षांची होती, याच दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि आरोपीने तिला प्रपोज केले. तिला लग्नाची मागणी घातली होती. मे २०२३ ते जून २०२६ या कालावधीत लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला.

Girl Molestation
Mumbai Airport Bomb Threat: बॉम्बच्या धमकीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तणाव

त्यातून ही मुलगी गरोदर राहिली आणि तिने राजावाडी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयातून ही माहिती प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार समजला.

त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. ही मोहीम सुरु असताना त्याला पोलिसांनी अटक केली.

Girl Molestation
Maharashtra Monsoon Delay: मान्सून लांबला, चिंता वाढली! मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात २० जूनपर्यंत ओढ देणार

ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत नंतर त्याला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news