

Marathi must come, BJP's habit is to create conflict; Azmi jumps into Hindi-Marathi debate
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात हिंदी भाषींकावर टीका केली होती.भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना थेट प्रत्यूत्तर दिले होते. महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मराठी - हिंदी वादावर सध्या राजकारण वादावर सध्या राजकारण तापले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी या भाषिक वादात उडी घेतली आहे. भाजपला मराठी बद्दल कसलेही प्रेम नाही हे त्यांची सवय आहे भांडण लावून द्यायची आहे हे लोक फक्त आणि फक्त सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळ फेकत आहेत अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदी भाषिकांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य केले हाते. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या विजयी मेळाव्यात हिंदी भाषिकांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "मारा, पण व्हिडीओ काढू नका." या विधानावर भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी थेट दिले होते. आमच्या पैशांवर जगताय, हिंमत असेल तर बाहेर या, आपटून आपटून मारू, असं वादग्रस्त वक्तव्य खा. दुबे यांनी केलं आहे. दुबे यांच्या वक्तव्यावर अबु आझमी यांनी टीका केली आहे.
पुढे त्यांनी भाजपाला अनेक सवाल केले आहेत. मराठी समाजासाठी आजपर्यंत काय काम केलं आहे. भाजपाचे काम फक्त मराठी आणि हिंदी भाषिक लोकांमध्ये वाद निर्माण करून देणे हाच अजेंडा भाजपा राबवित आहे. महाराष्ट्रात कायद्या सुव्यवस्था खराब झाली आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांच्या लोकांना हात लावत नाहीत तर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तर आमची तक्रार सुद्धा घेतली जात नाही. महाराष्ट्रामध्ये पोलीस सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे असा आरोप त्यांनी केला.
प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतोय, अनेक राज्यांमधून महाराष्ट्र मध्ये लोक उपाशी येतात पण इथे त्यांना रोजगार मिळतो. काही लोक आहेत जी राजकारणासाठी जागा बघत आहे, तर अनेक लोक महाराष्ट्र मध्ये येतात इथे काम करुन ते लोक करोडपती होत आहेत महाराष्ट्र व मुंबईमध्ये तेवढी क्षमता आहे असे ही अबू आझमी यांनी म्हटले आहे.
पुढे आझमी म्हणाले की महराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमीन आहे त्यांच्या राज्यात मुसलमानांना सन्मान दिला जायचा. तसचे महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायला पाहिजे त्यांनी मराठी शिकलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पुढे ते म्हणाले की मी स्वतः मराठी शिकत आहे पण कोणाच्या भीतीपोटी नाही तर महाराष्ट्रावर प्रेम आहे म्हणून मी ही भाषा शिकत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान करणे गरजेचे आहे, पण संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आझमी यांनी सांगितले. पुढे त्यानी महाराष्ट्राने महाराष्ट्राने खूप काही दिले आहे हे कबूल केले.