Mumbai CJP protest : तीन दिवस नाही, तीन महिने जेलमध्ये ठेवा, मी पुन्हा येईन; दिपकेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचले

२ ऑक्‍टोबर रोजी आंदोलन हीच खरी महात्मा गांधींना श्रद्धांजली
Mumbai CJP protest
Pudhari
Published on: 
Updated on: 

CJP protest Shivaji Park Mumbai

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे उपस्थित असणारे कोणी घाबरले आहे का ते पाहा. हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हे तुम्ही विसरले असाल आम्ही नाही. आम्हाला जेलमध्ये टाकायचे असेल तर टाका. तीन दिवस नाही तर तीन महिने जेलमध्ये ठेवा. यानंतरही मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशा शब्दांमध्ये कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी राज्य सरकारला डिवचले. शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनास प्रारंभ केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते.

आंबेडकर हे देशाचा कणा आहेत तर नेहरू देशाचा आत्मा

महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी आंदोलन करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. गांधींना जेवढे इंग्रजांनी छळले नाही, तेवढे यांनी आम्हाला छळले आहे. गोडसे हा भ्याड होता पण गांधींचे विचार कधी संपत नाहीत. कोणी म्हणाले मी विश्वगुरू आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेत जातात तेव्हा तिथले राष्ट्रपती पहिले बोलतात की गांधीजींच्या भारतातून मोदी आले आहेत. आंबेडकर हे देशाचा कणा आहेत तर नेहरू देशाचा आत्मा आहेत. आता निवडणूक जिंकून नेहरू, आंबेडकर आणि गांधी यांच्यापेक्षा मोठे बनू असे यांना वाटते, अशी टीकाही दीपके यांनी केली.

Mumbai CJP protest
Abhijeet Dipke - Mannat : ‘मैं शाहरुखका फॅन हूँ’, शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर अभिजित दिपकेंची हवा!

महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल

महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. त्यामुळे त्याला जगातील सर्वात बेस्ट, मुंबई पोलिसांना म्हटले जाते. दिल्लीत काही नतद्रष्ट आहेत. दिल्लीतील आयपीएस सचिन शर्मा हा पोलीस नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जनरल डायर आहे, असा आरोप करत आज दिल्लीतील आंदोलनात त्यांनी त्रास दिला आहे. थोडे थांबा, देशातून खूप लोक येतील, तुमचे बॅरिकेट्स कमी पडतील, अशा शब्दांमध्ये कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले.

Mumbai CJP protest
Abhijit Dipke CJP vs BJP : ३८० कोटींचा धुरळा, पुस्तकांत घोडचुका! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपकेची CJP आक्रमक

आता मत चोरी करुन रांगेत उभे राहण्‍यास लावले

देशाला किती देशाला लुटणार? नोटबंदी, करोना सगळीकडे रांगेत उभे राहिला लावले. आता मत चोरी करुन रांगेत उभे राहिला लावले आहे. सरकारमध्ये आहोत तर चांगल काम करा. जनतेच्‍या पैशावर जग फिरत आहात. मी चहा विकला, असे सांगतात. आम्‍ही सांगितलं होतं का चहा विका म्‍हणून, चांगला अभ्यास करायचा होता, अशी बोचरी टीकाही दीपके यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news