Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 'FIR'ची मागणी, नेमकं प्रकरण काय?

राज ठाकरे यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे
Raj Thackeray
Raj Thackeray(Pudhari Photo)
Published on
Updated on

Raj Thackeray News Hindi Marathi Language Row

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध कथित भाषण आणि हिंदी भाषेवरुन नागरिकांवरील कथित हल्ल्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचार भडकवणे आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे.

त्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे याआधीच तक्रार दाखल केली होती. पण त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. या मेळाव्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कथितपणे म्हटले होते की जे मराठी बोलत नाहीत त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. असे वक्तव्य हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

Raj Thackeray
Uddhav Thackeray : धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीमध्ये, पण चोर तो चोरच...; उद्धव ठाकरेंची पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना दिल्यावरून जहरी टीका

राज ठाकरे यांचे हे वक्तव्य मराठी भाषेबद्दल असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावाही उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे. राज ठाकरे हेतुपुरस्सर समुदायांमध्ये शत्रुत्व पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : कानाला जर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठी वाजणारचं !

'राज ठाकरेंची कृती देशाची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी', याचिकेतून दावा

राज ठाकरे यांची ही वक्तव्ये आणि कृती देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी आहे. हा भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १५२ नुसार दंडनीय गुन्हा आहे, असेही याचिकेत नमूद केले आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला कोणताही हिंसाचार आणि मॉब लिंचिंग विरोधात कठोर कारवाई करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठीचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणीही उपाध्याय यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news