

Raj Thackeray
मुंबई : नुकताच हिंदी सक्तीच्या विरोधासाठी झालेल्या मोर्चामुळे मिरा भाईंदरमध्ये गदारोळ झाला होता. मराठी भाषंकानी काढलेल्या मोर्चापुढे सरकाला नमते घ्यावे लागले हाते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मिरा भाईंदर येथे सभा घेतली यावेळी त्यांनी मराठी भाषेकडे वाकड्या नजरेने पाहून नका असा गर्भित इशारा दिला. त्यानी मिठाई दुकानदाराला बसलेल्यसा कानफाटीचे समर्थन केले. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही अरेरावी केली तर दणका बसणार, ‘मराठी कानाला समजत नसेल तर मराठी कानाखाली वाजणार’ अशा शब्दात मराठी विरोधकांचा समाचार घेतला.
दुकानदारांना मारहाण झाली म्हणून मोर्चा काढला. विषय समजून न घेता कोणत्यातरी पक्षाच्या दबावाखाली बंद पुकारलात पण मला एक प्रश्न विचारायचा आहेत की किती दिवस दुकाने बंद ठेवणार आहात. आम्ही काही घेतले तरच तुमची दुकाने चालतील, नाहीतर तुमची पोट कशी भरतील असा सवाल केला. नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हिंदी सक्तीची करणार त्यावर व्यक्त होताना राज ठाकरे म्हणाले की जर हिंदी सक्तीची करून सरकारला आत्महत्या करायची तर बेशक करावी. मस्ती करणार असाल तर महराष्ट्राचा दणका बसणार असा इशाराही दिला.
मुंबईच्या मुद्यावर बोलताना ते म्हणले की गुजराती नेत्यांना महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे. यासाठी खूप पूर्वीपासून प्रयत्न केले यामध्ये पहिल्यांदा देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभ भाई पटेलांनी पहिल्यांदा प्रयत्न केले , आम्ही लोहपुरष मानत होतो त्यांनी हे कारस्थान केले. तर मोराराजी देसाई यांनी मराठी माणसांवर गोळीबार केला. तुमचा मुंबईवर डोळा आहे. सत्ताधारी तुम्हाला चाचपडून बघतायेत, तपासूण बघतायेत हिंदी भाषा सक्ती आणली तर बघू मराठी माणूस शांत बसतो का असे त्यांना पाहायचे आहे. पण मराठी माणूस पेटून उठेल तुम्ही हिंदी सक्तीची करा मग मराठी माणसाचा दणका बघा असेही ते म्हणाले.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांवर जहरी टीका केली होती. आमच्या उद्योगधंद्यामुळे तुम्हाला रोजगार मिळतो. याचा चांगलाच समाचार ठाकरे यांनी घेतला. नुकतेच त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले होते की, “राज ठाकरे ज्या राज्यात जातील, तिथले लोक त्यांना आपटून आपटून मारतील.” यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले ‘निशिकांत दुबे तुम्ही मुंबईत या डुबो डुबो के मारेंगे’ असा टोला लगावला.
हिंदीविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की परवा जाने कानफटात खाली त्याला विचारा तुझी मातृभाषा कोणती? पण इकडचे तिकडचे उतरून हिंदी भाषिक तयार झाले आहेत. या हिंदीमुळे जास्त भाषा मारल्या गेल्या आहेत. हिंदी ज्यांनी स्वीकारली तिथेही आजपर्यंत 99% लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाहीत. हे सत्य आहेत. हनुमान चालीसा हे अवधी आहे हिंदी नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पुढे ते म्हणाले की माझे माझं सर्व भाषांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा माझं हिंदी बरं आहे... याचं कारण म्हणजे माझे वडील. कारण माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी उत्तम इंग्रजी उत्तम हिंदी आणि व्याकरणासकट उत्तम उर्दू सुद्धा येत होतं. त्यांच्यामुळेच मला या भाषा येऊ लागल्या. भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदी ही वाईट भाषा नाही पण ती तुम्ही लादणार असाल तर नाही बोलणारच नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या पत्रामध्ये सुद्धा लिहिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही. पण हिंदुत्वाच्या बुरख्याखाली तुम्ही माझी मराठी संपवत असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिम्मत असेल तर हात लावून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.