लॉकडाऊन, जिल्हाबंदी करणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले... | पुढारी

लॉकडाऊन, जिल्हाबंदी करणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले...

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोना संसर्ग रेट अधिक असला तरी अद्याप ऑक्सिजन आणि बेडची गरज भासलेली नाही. रुग्ण वाढत असले तरी तूर्तास जिल्हाबंदीचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊन लावण्याचाही विचार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी महत्वाची बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत भूमिका स्पष्ट केली.

रुग्णसंख्या वाढत आहे. पण सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण नाही. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. पण लोकल बंद करण्याचा विचार नाही. बैठकीत लसीकरण वाढविण्यावर एकमत झाले आहे. कोरोना रुग्णसंख्या कशी कमी होईल यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन, नाइट कर्फ्यू याबाबत केवळ चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री यावर निर्णय घेत असतात, असे टोपे यांनी सांगितले.

मुंबईत ८० टक्के बेड रिकामे आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. कुठेही जीवितहानी झालेली नाही. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात नेहमी चर्चा होते. यामुळे निर्णय घेण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या २,६३० वर पोहोचली आहे. यातील ९९५ रुग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक ७९७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीत आतापर्यंत ४६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button