राज्यातील १७० हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा | पुढारी

राज्यातील १७० हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असताना रुग्णसेवेत मोलाची भूमिका बजावलेल्या राज्यातील निवासी डॉक्टर डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात अडकू लागले आहेत. सेन्ट्रल मार्डने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सुमारे १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वैद्‍यकीय सेवेचा ताण अन्य निवासी डॉक्टरांवर येणार आहे. पीजी नीट ची भरती प्रक्रिया वेळेत झाली असती तर हा ताण कमी झाला असता, असे निवासी डॉक्टर सांगतात.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच पुन्हा एकदा हेल्थ वर्कर आणि डाॅक्टर्स पाॅझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील जवळपास मंगळवारी संध्याकाळपर्यंत 170 निवासी डॉक्टरांना कोराेनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. मुंबईतील जेजे, केईएम, नायर, कूपर आणि सायन रुग्णालयातील डॉक्टरांसोबत राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे.

जेजे रुग्णालय 51, केईएम- 40, सायन- 35, नायर -35, कूपर 7, ठाणे- कळवा शासकीय रुग्णालय -8, धुळे शासकीय रुग्णालय -8, नागपूर आयजीएम- 1, बीजे मेडिकल पुणे- 5, मिरज शासकीय रुग्णालय- 1, लातूर शासकीय रुग्णालय-1, त्याचप्रमाणे औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर जीएमसी आणि अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात देखील डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे सेन्ट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश माधव दहिफळे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button